वडीलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने सांगितलं खरं कापण; म्हणाला, "आईची इच्छा होती की..."
दिवंगत मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील आहे. प्रतीक पाटीलने गेल्या काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. प्रतीकच्या लग्नामध्ये वडील राज बब्बर आणि त्याचे दोन्हीही भाऊ अनुपस्थित होते. प्रतीकने वडिलांना आणि त्याच्या भावांना लग्नाचं आमंत्रण दिले नसल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आणि सोशल मीडियावर रंगली होती. अखेर प्रतीकने एका मुलाखतीमध्ये, लग्नाला वडील राज बब्बर आणि सावत्र भाऊ आर्या बब्बर आणि बहिण जुही बब्बर यांना का नव्हतं बोलवलं ? याचा खुलासा केला आहे. राज बब्बर यांची पहिली पत्नी नादिरामुळे बब्बर कुटुंबाला लग्नात बोलावलं नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आणि विद्यार्थांसाठी ‘आता थांबायचं नाय!’ प्रेरणादायी चित्रपटाच्या खास शोचे आयोजन
टाईम्स नाऊशी संवाद साधताना प्रतीक म्हणाला की, “माझ्या वडिलांची पहिली पत्नी नादिरामध्ये आणि माझी आई स्मितामधील संबंध व्यवस्थित नव्हते. जर तुम्ही ३८ ते ४० वर्षांपूर्वीच्या गोष्टी जर शोधून काढल्या तर कळेल की, माझ्या आईबद्दल कशापद्धतीने बोलले आहेत. मी माझ्या वडीलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दुसरा कार्यक्रम आयोजित करण्याच्या विचारात होतो. पण आईसोबत घडलेल्या गोष्टीमुळे मला माझ्या वडीलांना आणि त्यांच्याकडील लोकांना बोलवणं माझ्या आईच्या घरात बोलवणं मला बरोबर वाटलं नाही.”
“माझे वडील आणि त्यांची पहिली पत्नी माझ्या घरी येऊ शकले नाही, याचं मला वाईट वाटतंय. माझ्या आईने ते घर माझ्या संगोपनासाठी आणि सिंगल मदर म्हणून राहण्यासाठी विकत घेतलं होतं. तिला माझ्यासोबत सिंगल मदर म्हणूनच राहायचं होतं. मला माफ करा, पण त्या घरात लग्न करण्याचा एकंदरित निर्णय मी आणि माझ्या पत्नीने घेतलेला हा सर्वोत्तम होता. तो निर्णय कोणालाही नाकारण्याचा अधिकार नव्हता. तो माझ्या आईचा आणि तिच्या इच्छांचा आदर करण्याबद्दल निर्णय होता,” असं देखील प्रतीक मुलाखती दरम्यान म्हणाला.
प्रतीकच्या लग्नावर सावत्र भाऊ आर्यने त्याची खिल्ली उडवली होती. त्या प्रकरणावर प्रतीक म्हणाला की, “लोकं कुठलाही विचार न करता थेट प्रतिक्रिया देतात. घाई घाईत काहीही बोलून जातात. त्याने दिलेली प्रतिक्रिया मला खटकतेय. त्याचं बोलणं व्यवस्थित नव्हतं. वडीलांना आणि सावत्र भावाला लग्नाला नाही बोलवलं, तेच योग्य आहे. सध्याची परिस्थिती वेगळी आहे, त्यांच्या बाजूने आणखी गुंतागुंत वाढली आहे. मी अजूनही तसाच आहे.” दरम्यान, प्रतीकने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.