Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…”, प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा

प्रतीक मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये शिकायला गेला. चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या या अभिनय इन्स्टिट्युटमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. कारण होतं, ड्रग्जचं व्यसन… नुकतंच प्रतीकने एक मुलाखत दिली.

  • By चेतन बोडके
Updated On: May 07, 2025 | 07:38 PM
"मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…", प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा

"मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…", प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रतीक पाटील कायमच चर्चेतलं नाव… नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला हा बॉलिवूड अभिनेता सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांचा प्रतीक हा मुलगा आहे. प्रतीकच्या जन्मावेळी स्मिता पाटील यांना ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील अवयवांनी काम करणं बंद केले होतं. स्मिता पाटील यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी जगाचा निरोप घेतला.

२००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपटातून प्रतीकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा तो २२ वर्षांचा होता. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, तो मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये शिकायला गेला. पण चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या या अभिनय इन्स्टिट्युटमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. कारण होतं, ड्रग्जचं व्यसन… नुकतंच प्रतीकने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रतीकने ड्रग्जच्या व्यसनामुळे त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला.

आयुष्यातल्या गोष्टींचा पश्चात्ताप झाल्याचा खुलासा करताना प्रतीक पाटीलने सांगितलं की, “मी माझ्या लहानपणापासूनच खूप चुकीचे निर्णय घेतलेय. मी बालपणापासूनच दारु आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलो होतो. मी माझ्या काही विक गोष्टींमुळे (कमकुवतपणा) व्यसनाच्या आहारी गेलो होतो. माझ्याकडे व्यसन करण्यासाठी खूप कारणं होते. जेव्हा कोणासोबतही त्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा मला त्या गोष्टी फार गुंतागुतीची वाटते, त्यापेक्षा क्लिष्ट गोष्टी त्यावेळी होत्या. पण त्या निर्णयांमुळे माझ्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात मोठं नुकसान झालं.”

प्रतीकच्या जन्मावेळी स्मिता पाटील यांना ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील अवयवांनी काम करणं बंद केले होतं. स्मिता पाटील यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी जगाचा निरोप घेतला. आई गेल्यानंतर प्रतीकला त्याच्या आजी-आजोबांनी (स्मिताचे आई-वडील) त्याचं संगोपन केलं. पण त्यांना खूप त्रास दिल्याचा आता प्रतीकला पश्चात्ताप आहे. ” आजी- आजोबांच्या जाण्याआधीच्या शेवटच्या काही वर्षांत मी त्यांना फार वाईट अवस्थेत पाहिलं. मी व्यसनी होतो. मला व्यसनाधीन पाहूनच माझी आजी वारली, याचा मला पश्चात्ताप आहे. आज मी जसा आहे तसं मला तिने पाहिलं असतं तर बरं झालं असतं,” असं म्हणत अभिनेत्याने आपलं पश्चातापाचं कारण सांगितलं.

ड्रग्जच्या अधिन गेल्यामुळे प्रतीकला शाळा, महाविद्यालयांमधून आणि ड्रामा स्कुलमधूनही काढून टाकण्यात आलं होतं, असा खुलासा प्रतीकने मुलाखतीदरम्यान केला होता. ” मी ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटाचं शूटिंग केलं आणि मग व्हिसलिंग वुड्समध्ये गेलो. त्यावेळी मी अभ्यास करत होतो. पण मला अभ्यासात उत्साहाच नव्हता. कारण मी काय करतोय आणि काय नाही हेच मला माहिती नव्हतं. मी तिथे २ वर्षे होतो. मी ड्रग्ज घेतल्याने मला व्हिसलिंग वुड्समधून बाहेर काढण्यात आलं. आता जेव्हा मी त्याबद्दल विचार करतो तेव्हा मला हसायला येतं. मी ज्या ज्या शाळेत आणि कॉलेजमध्ये गेलो तिथून मला हाकलून लावण्यात आलं. कारण मी उपद्रवी होतो.”

Web Title: Prateik smita patils painful confession my grandmother died seeing me a drug addict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • bollywod news
  • Bollywood
  • Prateik Babbar

संबंधित बातम्या

Toxic: रॉकी भाईच्या चित्रपटात कियारानंतर बॉलिवडूच्या महाराणीची एन्ट्री, फर्स्ट लूक आला समोर, अभिनेत्रीला ओळखलंत का?
1

Toxic: रॉकी भाईच्या चित्रपटात कियारानंतर बॉलिवडूच्या महाराणीची एन्ट्री, फर्स्ट लूक आला समोर, अभिनेत्रीला ओळखलंत का?

धुरंधर चित्रपटावर प्रतिक्रिया देताना रहमान डकैतच्या मित्राने खोलली पाकिस्तानची पोल, बॉलिवूडचे मानले आभार अन् म्हणाला…
2

धुरंधर चित्रपटावर प्रतिक्रिया देताना रहमान डकैतच्या मित्राने खोलली पाकिस्तानची पोल, बॉलिवूडचे मानले आभार अन् म्हणाला…

‘Stranger Things 5 Volume 2’ मध्ये काजोलने केला कॅमिओ ? सोशल मीडिया व्हायरल क्लिपचा सत्य उलगडलं
3

‘Stranger Things 5 Volume 2’ मध्ये काजोलने केला कॅमिओ ? सोशल मीडिया व्हायरल क्लिपचा सत्य उलगडलं

”तुम्ही मला मोठ्या भावासारखा पाठिंबा दिलात…”, सलमान खानच्या 60 व्या वाढदिवशी रितेश भाऊची खास पोस्ट, म्हणाला…
4

”तुम्ही मला मोठ्या भावासारखा पाठिंबा दिलात…”, सलमान खानच्या 60 व्या वाढदिवशी रितेश भाऊची खास पोस्ट, म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.