Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पं. उदय भवाळकर यांना कालिदास पुरस्काराने सन्मानित…

मध्यप्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ धृपद गायक पं.उदय भवाळकर यांना प्रदान करण्यात आला.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 13, 2024 | 09:03 PM
पं. उदय भवाळकर यांना कालिदास पुरस्काराने सन्मानित...

पं. उदय भवाळकर यांना कालिदास पुरस्काराने सन्मानित...

Follow Us
Close
Follow Us:

मध्यप्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ धृपद गायक पं.उदय भवाळकर यांना त्यांच्या शास्त्रीय संगीतातील अतिशय प्राचीन अशा धृपद संगीतातील भरीव योगदानासाठी नुकताच प्रदान करण्यात आला.

मंगळवार १२ नोव्हेंबरला पं. उदय भवाळकर यांना उज्जैन येथे मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या हस्ते रोख रक्कम ५ लाख आणि ताम्रपत्र अशा स्वरूपाचा वर्ष २०२२ साठीचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मध्यप्रदेश शासन आणि सांस्कृतिक विभागातर्फे साहित्य, संगीत, सृजनात्मकता अशा बहुउल्लेखनीय कार्यात अतुल्य योगदान देणाऱ्या अशा कलाकारांना प्रतिवर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार जाहीर होतात.

हे देखील वाचा- ‘कांगुवा’ रिलीज होण्यापूर्वीच ‘कल्ट क्लासिक’ घोषित, सुर्या-बॉबी देओलने जिंकले मन!

आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गायक पं.उदय भवाळकर म्हणाले की, ‘मला मध्य प्रदेश सरकारच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा असा कालिदास सन्मान भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड ह्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला ह्याचा मला अतीव आनंद आहे. हा पुरस्कार मी माझे गुरुजन आणि माझ्या आई वडिलांना समर्पित करतो. हा पुरस्कार हा प्राचीन अशा धृपद शैलीचा सन्मान आहे असे ही मला वाटते. तसेच धृपद क्षेत्रात अजून चांगले काम करण्याची माझी जबाबदारी देखील वाढली आहे ह्याची माझ्या मनात जाणीव आहे. माझी धृपद साधना ही अशीच अखंडपणे चालू राहो आणि माझ्या शिष्यांना ही उत्तम प्रकारे घडविण्याचे काम माझ्या हातून घडत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.बावधन,पुणे येथे जे धृपद विद्यार्थ्यांसाठी स्वरकुल उभे आहे त्या मार्फत मी माझे कार्य सदैव करीत राहीन.

हे देखील वाचा- गोध्रा दंगलीत पाकिस्तानचा सहभाग ? ‘द साबरमती रिपोर्ट’मधून उलगडणार सत्य

पंडित उदय भवाळकर, हे मध्य प्रदेशातील मालवा प्रदेशातील उज्जैनच्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत. ते झिया मोहिउद्दिन डागर आणि झिया फरिदुद्दीन डागर ह्यांचे शिष्य असून, देश विदेशातील अनेक रसिकांपर्यंत त्यांनी आपले धृपद संगीत विविध महोत्सव आणि मैफलींमधून पोहोचविले आहे. मागील २५ वर्षाहून अधिक काळ त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. देश विदेशात कार्यक्रमां बरोबरच ते पुण्यात बावधन येथे ‘स्वरकुल’ या त्यांच्या निवासी गुरुकुलामध्ये गुरू शिष्य परंपरेत प्राचीन अशा धृपद संगीताची विद्या देत आहेत. पं.उदय भवाळकर यांची एक निःस्वार्थ समर्पित ध्रुपद गुरु आणि उत्कृष्ट संगीतकार म्हणून जगभरातील रसिकांमध्ये ख्याती आहे.

Web Title: Prestigious kalidas samman awarded by the madhya pradesh state government for outstanding performance in the field of arts was presented to national award winner and veteran dhrupad singer pt uday b

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 09:03 PM

Topics:  

  • Indian classical singer

संबंधित बातम्या

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
1

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.