'द साबरमती रिपोर्ट'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, पहिल्या विकेंडला कसा मिळाला प्रतिसाद ?
धीरज सरना दिग्दर्शित‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला देशभरात रिलीज होणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. २००२ मधील, गुजरातमधल्या गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेस आग प्रकरणावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये, 2002 च्या गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला लावलेल्या आगीतील अनेक किस्से दाखवले आहेत. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे ? याचा उलगडा चित्रपटात होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा- ‘सिटाडेल: हनी बनी’ची जगभरात तुफान क्रेझ, सीरीजच्या नावावर नवा रेकॉर्ड
पण अशातच इंडस्ट्रीतल्या एका विश्वसनीय सुत्राने दिलेल्या माहितीनुसार २००२ मधील गुजरातमधल्या गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेस आग प्रकरणामध्ये पाकिस्तानाचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंडस्ट्रीच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात गोध्रा दंगलीत पाकिस्तानची भूमिका होती, असा एक संदर्भ देण्यात आला आहे. चित्रपटात त्याच संदर्भातील दृश्ये आहेत. हा चित्रपट कठोरपणे तथ्यांवर आधारित आहे आणि वास्तविकता उघड करेल. गोध्रा दंगलीबद्दल कधीही न ऐकलेली सत्यता यात बघायला मिळणार…” अशी शक्यता या रिपोर्टमध्ये वर्तवली आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात विक्रांत मॅस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरनाने केले आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.