
मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले 2’ (Ratris khel chale) या मालिकेत पूर्वाची लग्न घटीका समीप आली आहे. त्यामुळे नाईकांचा वाडा सजला आहे.अख्ख नाईक कुटुंब या लग्नासाठी आवर्जून उपस्थित आहे. नववधूला शुभआशीर्वाद देण्यासाठी माई , अभिराम, माधव (Madhav)यांनी पुढाकार घेत हे लग्न निर्विघ्न पार पडावा यासाठी कंबर कसली आहे. पण अण्णा आणि शेवंता (Anna And Shevanta)यादोघांच्या लग्नात खडातर टाकणार नाहीत ना ? कारण अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे आणि त्यासाठी ते दोघे शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी सयाजी आणि कावेरी(Sayaji and kaveri) यांना वश करून आपला डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न असफल होत आहेत. त्यामुळे अण्णा आणि शेवंताचं लग्न जोपर्यंत होत नाही तो पर्यंत या वाड्यात कुठलंच मंगलकार्य होऊ द्यायचं नाही असं अण्णा आणि शेवंता मनाशी पक्क करतात. इतक्यातच पूर्वाच्या लग्नाची तयारी अभिराम (Abhiram) जोरात करतोय. पण त्यातही काही तरी विघ्न येणार अशी चाहूल वच्छीला लागते. काहीही झालं तरी हे लग्न निर्विघ्न पार पाडायचं अभिराम ठरवतो.
तसंच माई नेहमीच आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी झटत आल्या आहेत. त्यांची पुण्याई यावेळी कामी येणार की अण्णा (Anna Naik) आणि शेवंताची सूड भावना नाईकांच्या सुखात मिठाचा खडा टाकणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.