'रेड २'ची बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई, 'दृश्यम २' आणि 'तानाजी'चा रेकॉर्ड मोडत ठरला सुपरहिट
२०२५ या वर्षातला अजय देवगणचा नुकताच दुसरा चित्रपट रिलीज झाला आहे. रविना टंडनची लेक राशा थडानी हिच्यासोबत ‘आझाद’ चित्रपटामध्ये काम केल्यानंतर अजय देवगणचा दुसरा चित्रपट रिलीज झाला आहे. २०१८ मध्ये, अजय देवगण आणि इलियाना डिक्रुझचा ‘रेड’ चित्रपट रिलीज झाला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग आता रिलीज झाला आहे. पहिल्या भागामध्ये अजयसोबत नकारात्मक भूमिकेत प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते सौरभ शुक्ला होते. आता अजय देवगण सोबत मुख्य भूमिकेत वाणी कपूर असून नकारात्मक भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख आहे.
कपूर कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर, अनिल कपूर- बोनी कपूरच्या आईचे निधन…
घोषणा झाल्यापासूनच चर्चेत राहिलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १ मे अर्थात ‘महाराष्ट्र दिनी’ रिलीज झाला. त्यासोबतच ॲडव्हान्स बुकिंगमध्येही जबरदस्त कमाई करणाऱ्या चित्रपटाला रिलीजनंतर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अजय देवगण आणि रितेश देशमुख स्टारर ‘रेड २’ चित्रपटाला रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा रिलीजनंतर दोन दिवसांत कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ग्रॅंड ओपनिंग केल्यानंतर आता ‘रेड २’ चं दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे.
कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा
राज गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला. ‘रेड’ प्रमाणेच ‘रेड २’लाही प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या १९.२५ कोटींची कमाई केली होती. आता दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ११.७५ कोटींची कमाई केलेली होती. ४८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘रेड २’ चित्रपटाने दोन ३१ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी फार चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी इतका खास प्रतिसाद मिळाला नाही. पण येत्या शनिवार आणि रविवारी चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कुडाळमध्ये नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ, लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दरम्यान, ‘रेड २’ ने दोन दिवसांत ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘रेड २’ ने अजय देवगणच्या ३ मोठ्या चित्रपटांना मागे टाकले होते. त्या तीन चित्रपटामध्ये ‘शैतान’, ‘दृश्यम २’ आणि ‘तानाजी’ ह्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. ‘शैतान’ने पहिल्या दिवशी १५.२१ कोटी रुपये कमावले होते. ‘दृश्यम २’ ने पहिल्या दिवशी १५.३८ कोटी रुपये कमावले होते आणि ‘तान्हाजी’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १५.१० कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. या सर्वांच्या तुलनेत, ‘रेड २’ ने पहिल्या दिवशी खूपच चांगली कामगिरी केली आहे. ‘रेड २’ चित्रपटाबद्दल सांगायचं तर, चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक एकच गर्दी करत आहेत. अजय देवगण, रितेश देशमुख तसेच वाणी कपूर, सौरभ शुक्ला यांच्यासह इतर कलाकारांचं काम जबरदस्त आहे. अजय देवगण चित्रपटामध्ये अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे.