रितेश देशमुख आणि अजय देवगन स्टारर ‘रेड २’ चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. हा बहुचर्चित चित्रपट गुरुवारी १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा ‘भूतनी’ आणि हिट ३’ आणि ‘रेट्रो’ सोबतच हॉलिवूड चित्रपट ‘थंडरबोल्ट्स’सोबत टक्कर झालीये. पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग करणाऱ्या ‘रेड २’ ने चौथ्या दिवशी दमदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. तब्बल ७ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल आलाय. ‘रेड २’ चित्रपटाद्वारे अजय देवगणने पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या भूमिकेच्या माध्यमातून अजयने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘Indian Idol 12’ विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात; कशी आहे गायकाची तब्येत? जाणून घ्या अपडेट!
चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय. रिलीजच्या पहिल्या दिवशीच हा चित्रपट २०२५ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अजय देवगन आणि वाणी कपूरच्या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांमध्ये जबरदस्त कमाई केलेली आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी २१. ५० कोटींची कमाई केलेली आहे. ही आजवरची सर्वाधिक कमाई आहे. पहिल्या दिवशी चित्रटाने १९. २५ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १८ कोटींची तर, तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी १२ कोटींची कमाई केलेली आहे. एकूण चार दिवसांतच चित्रपटाने ७०. ७५ कोटींची कमाई केलेली आहे.
जगभरातल्या कमाईबद्दल सांगायचं तर, रितेश देशमुख आणि अजय देवगन स्टारर ‘रेड २’ चित्रपटाने जगभरात उत्तम कमाई केली आहे. चित्रपटाने चार दिवसांत परदेशात कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने एकूण ९१.२५ कोटी रुपयांचं कलेक्शन केले आहे. अजय देवगणचा हा चित्रपट गुरुवारी, १ मे रोजी कामगार दिनी प्रदर्शित झाला. अजय देवगणच्या ‘रेड २’ चित्रपटाने २०२५ मधील पहिल्याच विकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान प्रस्थापित केले. दरम्यान, ‘रेड २’ चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. ‘स्काय फोर्स’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांच्या ओपनिंग वीकेंडमध्ये ६२.२५ कोटी रुपये आणि चार दिवसांत ६९.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या यादीत विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट अव्वल स्थानावर आहे, ज्याने पहिल्या आठवड्यात ३ दिवसांत ११६.५० कोटी रुपये आणि ४ दिवसांत १४०.५० कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘सिकंदर’ आहे. ४ दिवसांत या चित्रपटाने ₹८४.२५ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट रविवारी प्रदर्शित झाला होता.