Sitaare Zameen Par Trailer Twitter Review Netizens Starts Boycott To Movie Says Aamir Khan Accent Is Like Pk
आमिर खानच्या आगामी ‘सितारा जमीन पर’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. काल, निर्मात्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना एक प्रश्न विचारून त्यांचा उत्साह वाढवला होता. निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली होती आणि लोकांना विचारले होते, ‘तुम्ही आमच्या सितारेसाठी तयार आहात का?’ हे पाहून लोक खूप आनंदी झाले आणि सर्वजण अंदाज लावू लागले की चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येणार आहे. आता ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, परंतु त्याआधी निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. आणि प्रेक्षकांचा आणखी उत्साहित केले आहे.
पोस्टरबद्दल बोलायचे झाले तर, त्यात आमिर खान दिसत आहे. त्याच्याशिवाय, या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. आता पोस्टरमध्ये आमिर खानसोबत १० नवीन कलाकार दिसत आहेत, हे सगळे कलाकार या चित्रपटाची कथा आणखी मनोरंजक करणार आहेत. या चित्रपटाद्वारे आमिर खान प्रॉडक्शनने आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांसारखे 10 नवीन चेहरे सिनेमाइंडस्ट्रीत लाँच केले आहेत.
१० नवीन कलाकार केले लाँच
आता या पोस्टरमुळे चाहते चित्रपटासाठी आणखी उत्सुक झाले आहेत. ‘सितारा जमीन पर’ या चित्रपटातून आमिर खान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट होता. तसेच या चित्रपटामध्ये तो जेनेलिया डिसूझासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पोस्टरवरून असे दिसते की यावेळी पडद्यावर खरोखर काहीतरी खास पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने भरपूर मनोरंजन होणार आहे.
कन्नड चित्रपट इंडस्ट्री सोनू निगमवर घालणार बंदी, वादग्रस्त विधानानंतर गायक सापडला मोठ्या अडचणीत!
‘सितारा जमीन पर’ कधी प्रदर्शित होणार?
आता या पोस्टरसोबतच ‘सितार जमीन पर’ची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा अर्थ आता चाहत्यांना पुढील महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. आता चाहते कमेंट सेक्शनमध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असे कंमेंट करताना दिसत आहेत. ते ट्रेलर रिलीज करण्याची मागणीही करत आहेत. प्रेक्षक ट्रेलर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.