नागर्जुन, श्रुती हासन, रजनीकांत अन् सत्यराज, टॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज एकाच स्क्रीनमध्ये दिसणार
सुपरस्टार रजनीकांतने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूड इतर इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची मोहोर पाडली आहे. वयाच्या साठाव्या वर्षातही सुपरस्टार रजनीकांत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतात. ‘जेलर’ आणि ‘लाल सलाम’ नंतर रजनीकांत एका दर्जेदार चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्यांचा दर्जेदार अंदाज प्रेक्षकांच्या पसंदीस पडला आहे.
रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘कूली’ असं असून त्यांच्यासोबत टॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज सेलिब्रिटीही एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. रजनीकांत यांच्यासोबतच इतर कलाकारांचाही लूक चाहत्यांच्या पसंदीस पडला आहे. रजनीकांत यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत सौबिन शाहिर, नागार्जुन, श्रुती हसन, सत्यराज आणि निम्मा उपेंद्र अशी तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पोस्टरविषयी सांगायचं तर, ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर असून रजनीकांत यांच्या हातात १४२१ क्रमांकाचा बिल्ला दिसत आहे.
Out of all the first looks released by @Dir_Lokesh handle from #Coolie movie, King Nagarjuna look as Simon is the most liked and has the most reach🔥
Definitely it’s the best look of @iamnagarjuna in recent times and looks like a complete swagster💥#Nagarjuna #Rajinikanth 💯 pic.twitter.com/tuETsJThVY
— Akkineni Kings (@Akkineni_Kings) September 3, 2024
रजनीकांत आपल्या धारदार नजरेने त्या बिल्ल्याकडे पाहत आहेत. चित्रपटात रजनीकांत देवाही भूमिका साकारणार आहेत. रजनीकांत यांच्या लूकवर चाहत्यांकडून पसंती मिळत असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्याशिवाय इतर कलाकारांच्याही लूकचे सध्या कौतुक केले जात आहे. इतर कलाकारांच्या लूकविषयी सांगयचे तर, सौबिन शाहीर दयालच्या भूमिकेत, नागार्जुन सिमॉनच्या भूमिकेत, श्रुती हासन प्रितीच्या भूमिकेत तर सत्यराज राजसेकरच्या भूमिकेत आणि निम्मा उपेंद्र कालेशाच्या भूमिकेत दिसणार आहे.
लोकेश कनगराज यांनी ‘कूली’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. लोकेश यांनी याआधी ‘विक्रम’ आणि ‘लिओ’ सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे ‘कूली’ हा सिनेमाही या युनिव्हर्सचा भाग आहे का, हे सिनेमा आल्यावरच कळेल.