सौजन्य - सोशल मीडिया
Jahnavi Killekar Sister In Law Sandhya Killekar Post : बिग बॉसच्या इतिहासात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सीझनपैकी एक सीझन म्हणजे, बिग बॉस मराठी ५… अगदी सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिग बॉसच्या घरात जोरदार वाद होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला पॅडीचा अपमान केल्यामुळे तिला जेलमध्ये टाकलं होतं. शिवाय, तिला ‘भाऊच्या धक्का’वर देखील बसून दिलं नाही. त्याशिवाय, अनेक टास्कमध्येही तिला सहभाग होऊन दिलं नव्हतं. आठवडाभर शिक्षा भोगल्यानंतर आता ह्या सर्व बंधनातून जान्हवी किल्लेकर मुक्त करण्यात आले आहे.
शनिवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर बिग बॉसने जान्हवीला बाहेर येण्याची परवानगी दिली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची आणि घरातल्या स्पर्धकांचीही तिने माफी मागितली. त्यानंतर जान्हवी ‘भाऊच्या धक्का’वर येऊन बसली. तिने आपली शिक्षा पूर्ण करूनही रितेशने तिला ‘भाऊच्या धक्का’वर स्थान दिलं नाही. शनिवारच्या एपिसोडमध्ये रितेशने जान्हवीला “गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे तुम्ही या आठवड्यातही ‘भाऊच्या धक्का’वर बसू शकत नाही.” असं म्हणत तिला बाहेरच्या स्पेसमध्ये बसायला सांगितलं. आता ह्या सर्व मुद्द्यावर अभिनेत्रीच्या जाऊबाईने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.
इन्स्टा स्टोरीमध्ये जान्हवीच्या जाऊबाईं संध्या किल्लेकर यांनी आपलं मत मांडलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये जान्हवीची जाऊबाई म्हणते, “घरातील वस्तूंची आदळआपट करुन Bigg Boss Houseचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. टास्कमध्ये आक्रमकता दाखवून Physically Violent होण्याला शिक्षा तर नाहीच पण, भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. घरातीलच एका सदस्यावर शिवीगाळ करून Bip Bip.. ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण साधी चर्चाही नाही. पण, ‘भाऊच्या धक्का’वर स्थान आहे. आणि जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही, घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफी मागूनही, प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही. हे खरंच खूप Unfair आहे जान्हवीसाठी… घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही ‘भाऊच्या धक्का’वर बसण्याचा तितकाच अधिकार आहे.”