राजकुमार- पत्रलेखा देणार 'गोड बातमी', लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखाची गणना होते. या प्रसिद्ध कपलने नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा आई- बाबा होणार आहे. या कपलने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली आहे. लवकरच या प्रसिद्ध कपलच्या घरी पाळणा हलणार आहे. पत्रलेखाने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
इमरान हाश्मी आणि हिमेश रेशमियाची पुन्हा रंगणार केमिस्ट्री, चाहते खुश; म्हणाले २००० चा काळ परतणार
राजकुमार राव वयाच्या ४० व्या वर्षी आणि पत्रलेखा वयाच्या ३५ व्या वर्षी पालक होणार आहे. “बाळ लवकरच जन्माला येणार आहे.”, असं कॅप्शन पत्रलेखाने शेअर केलेल्या पोस्टला दिलेले आहे. राजकुमार आणि पत्रलेखा त्यांच्या पहिल्या बाळासाठी कमालीचे उत्सुक आहेत. पत्रलेखाने शेअर केलेल्या पोस्टवर, हुमा कुरेशी, जय सोनी, सोनाक्षी सिन्हा, नेहा धुपिया, उर्फी जावेद, भारती सिंग, नुसरत भरुचा, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी, रिद्धिमा कपूर साहनी, ताहिरा कश्यप, वरुण धवन, सोनम कपूरसह अनेक कलाकारांकडून राजकुमार आणि पत्रलेखा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
जिगरबाज समृद्धी… ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कृष्णाने ४० फूट खोल विहिरीत मारली उडी
‘मलिक’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात मानुषी छिल्लर सुद्धा दिसणार आहे. तिने चित्रपटामध्ये राजकुमारच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक केले. कारण पहिल्यांदाच तो इतका जबरदस्त अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. सर्वांना त्याचा डार्क आणि इंटेन्स लूक आवडला आहे आणि तो पडद्यावर पाहण्यास सर्वच लोकं उत्सुक आहेत. यात हुमा कुरेशीचे एक आयटम सॉंगमध्ये दिसणार आहे, ज्यावर अनेक युजर्सकडून रील बनवले जात आहेत. हा चित्रपट ५४ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.