samruddhi kelkar jumped into a 40 foot deep well in kolhapur halad rusli kunku hasla serial
स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक होताना दिसतंय. या मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतलाय. शेतातल्या विहिरीत स्वाती पडल्याचं कळताच मागचा पुढचा कोणताही विचार न करता कृष्णाने या विहिरीत उडी मारली. मालिकेतला हा अतिशय कठीण प्रसंग कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने जिद्दीने पूर्ण केला.
स्नेहलता वसईकरचा जबरदस्त कमबॅक, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत साकारणार दमदार भूमिका
मालिकेच्या शुटिंग दरम्यानचा अनुभव सांगताना समृद्धी म्हणाली की, “मला पोहायला येतं मात्र इतक्या खोल पाण्यात मी कधीही उतरले नव्हते. या सीनविषयी कळताच तो कसा शूट होणार याची उत्सुकता होती. अखेर शूटचा तो दिवस उजाडला. कोल्हापुरातल्या एका शेतातल्या ४० फूट खोल विहिरीत उडी मारण्याचा सीन होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका टेकमध्ये हा सीन पूर्ण करायचा होता. मी कोणताही बॉडी डबल न घेता हा सीन करण्याचा ठरवलं. ”
काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत
“मनाची तयारी केली आणि मी विहिरीत उडी घेतली. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. मालिकेच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आणि माझी काळजीही घेतली. दोन पट्टीचे पोहणारे विहिरीत माझ्यासोबत होते. मला धाडसी प्रयोग करायला नेहमीच आवडतं. या सीननंतर माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे असंच म्हणेन. तेव्हा नक्की पाहा हळद रुसली कुंकू हसलं दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.” असं अभिनेत्री अनुभव सांगताना म्हणाली.