बॉलीवूड सिस्टर्स ज्या बांधतात एकमेकींना राखी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रक्षाबंधन म्हणजे ‘रक्षण करण्याचे वचन देत दिलेले बंधन’. दरवर्षी, बहीण तिच्या भावाच्या मनगटावर मोठ्या थाटामाटात राखी बांधते आणि भाऊ तिला भेटवस्तू आणि संरक्षणाचे वचनदेखील देतो. हा सण केवळ भावा-बहिणीसाठीच नाही तर काहीही न बोलता तुमच्या मागे खांबासारखा उभा राहणाऱ्या प्रत्येक नात्यासाठी खास आहे. मग तो भाऊ-भाऊ असो किंवा दोन बहिणी असोत.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक बहिणी आहेत ज्यांना सख्खा भाऊ नाही. त्यांना कधीही भावाची कमतरता भासत नाही, कारण त्या दोन्ही बहिणी नेहमीच एकमेकांसोबत खंबीरपणे उभ्या राहतातच, शिवाय रक्षाबंधनाच्या खास प्रसंगी एकमेकांच्या मनगटावर राखी देखील बांधतात. तर, रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींची सुपरहिट जोडी कोणती आहे आपण जाणून घेऊया
करिना आणि करिश्मा कपूर
बॉलीवूडमधील बहिणींची सर्वात प्रसिद्ध आणि आवडती जोडी
या यादीत पहिले नाव करिश्मा कपूर आणि करीना कपूर आहे. लोलो अर्थात करिश्मा कपूर ही मोठी आहे आणि बेबो अर्थात करिना कपूर ही धाकटी बहीण आहे. करिना कपूरने अनेकदा सांगितले आहे की करिश्मा तिच्या आयुष्यातील सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे. ती तिचा भाऊ, बहीण आणि तिच्या आयुष्यातील मित्र आहे. रणबीर-आदर आणि अरमान जैन तिचे चुलत भाऊ असले तरी, या दोन्ही बहिणी एकमेकांना राखी बांधतात.
शिल्पा शेट्टी- शमिता शेट्टी
शिल्पाच्या प्रसिद्धीचा परिणाम कधीही त्यांच्या नात्यावर झाला नाही
बॉलिवूडच्या सुपरस्टार बहिणींच्या यादीत शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी यांचे नावदेखील समाविष्ट आहे. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीला एकाच वेळी सुरुवात केली होती, परंतु शमिताला बॉलिवूडमध्ये शिल्पाला मिळालेले यश मिळू शकले नाही. तथापि, अपयश आणि यशाचा त्यांच्या नात्यावर कधीही परिणाम झाला नाही.
क्रिती सेनन आणि नुपूर सेनन
बॉलीवूडमधील क्रिती आणि नुपरची आवडती बहीणीची जोडी
क्रिती सेनन आणि नुपूर सेनन या बहिणींची एक घट्ट जोडी आहे. दोघीही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. क्रितीचा समावेश आधीच अभिनेत्रींच्या यादीत झाला आहे, तरीही नुपूर अजूनही इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. क्रिती आणि नुपूर दरवर्षी एकमेकांसोबत रक्षाबंधन मोठ्या थाटामाटात साजरे करतात आणि याशिवाय प्रत्येक पार्टी आणि ट्रॅव्हलिंगमध्येही या दोघी एकमेकींसह कायम सोबत दिसतात
२५ वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायचा ‘भाऊ’ बनणार होता सलमान खान, मग असं काय घडलं की…, जाणून घ्या
भूमी पेडणेकर आणि समीक्षा पेडणेकर
समीक्षा आणि भूमी पेडणेकर यांचीही जोडी आहे अतूट
भूमी पेडणेकर ही बॉलिवूड अभिनेत्री आहे, तर तिची बहीण समिक्षा ही व्यवसायाने वकील आणि व्यावसायिक आहे. दोघीही एकमेकांसारख्या दिसतात की त्यांना पाहून चाहतेही गोंधळून जातात. या दोघी जुळ्या आहेत की काय असेच बऱ्याच जणांना वाटते. दोघींचे नाते खूपच मजबूत आहे. गेल्या वर्षी भूमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये समिक्षा तिला राखी बांधत आहे असे दिसून येत आहे.
दीपिका पादुकोण – अनिशा पादुकोण
दीपिका आणि अनिशा दोघीही प्रसिद्ध आहेत
बॉलिवूडच्या जवळच्या बहिणींच्या यादीत एक नाव म्हणजे दीपिका पदुकोण आणि तिची बहीण अनिशा पदुकोण. दीपिका बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना, तिची बहीण क्रीडा जगात स्वतःचे नाव कमवत आहे. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या दीपिका पदुकोणलाही भाऊ नाही, म्हणून ती तिच्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरे करते.
याशिवाय आलिया भट्ट आणि तिची बहीण शाहीनही नेहमीच एकत्र दिसतात आणि एकमेकींना साथ देतात. तसंच काजोल आणि तिची बहीण तनिषा मुखर्जीदेखील बरेचदा एकत्र असतात, त्यांचे आणि प्रेम आणि भांडण हा दोन्ही चर्चेचा विषय असतो. तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूरदेखील नेहमीच एकत्र दिसतात. मलायका आणि अमृता अरोरा या बहिणीही कायम चर्चेत असतात.