रणदीप हुड्डाने सपत्नीक सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या साधेपणाचे केले कौतुक
गणेशोत्सव म्हटलं की, सर्वांचं आकर्षणाचं केंद्रबिंदु ठरतो तो लालबागच्या राजाचा. गेल्या अनेक दिवसांपासून लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये होणाऱ्या घटनांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. नुकतंच अभिनेत्री सिमरन बुधरूप हिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी दर्शनादरम्यान तिच्यासोबत गैरवर्तवणूक झाली. यामुळे अभिनेत्री मंडळातील कार्यकर्त्यांवर आणि सुरक्षारक्षकांवर चांगलीच संतापली. लाडक्या गणरायाचे दर्शन घेताना फक्त सामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटीही सुरक्षित नाहीत, हे आपण अनेकदा पाहिलं असेल. अशातच अभिनेता रणदीप हुड्डाने सर्वसामान्य भाविकांबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
हे देखील वाचा – कलर यलो प्रॉडक्शन्सने आयकॉनिक लव्ह ट्रँगल ‘मनमर्जियां’ची ६ वर्षे केली साजरी!
अनेक बडे सेलिब्रिटी, राज्यातील प्रमुख नेते मंडळींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात. सगळेच बडे मंडळी व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेत असल्यामुळे सोशल मीडियावरून त्यांना ट्रोल केले जात आहे. रांग न लावता थेट बाप्पाच्या चरणी दर्शन घेत असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर ट्रोल होतात. पण असं असलं तरीही अभिनेता रणदीप हु़ड्डा आणि त्याची पत्नी सध्या त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आले आहे. रणदीपने लालबागच्या राजाचे सर्वसामान्य भाविकांबरोबर रांगेत उभे राहून घेतले, ज्यामुळे त्याचं कौतुक होत आहे. सर्वसामान्य भाविकांबरोबर दर्शनाला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Randeep Hooda and Lin Laishram, skip VIP privileges for Lalbaug cha Raja darshan, get applauded by people@randeephooda @LinLaishram pic.twitter.com/BtgNP0yalj — Urban Asian (@UrbanAsian) September 13, 2024
अरबन आशियन नावाच्या एक्स पेजवरून रणदीप सपत्नीक गणरायाचे दर्शन सर्वसामान्य भाविकांबरोबर घेताना दिसत आहे. अभिनेत्याच्या ह्या साधेपणाचे नेटकरी कौतुक करीत आहेत. रणदीपने सर्वसामान्य भाविकांबरोबर रांगेत उभं राहून दर्शन घेतल्यामुळे नेटकरी त्याचं आणि त्याच्या पत्नीचं भरभरून कौतुक करत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकरी म्हणतात, “प्युअर जेंटलमेन रणदीप.”, “लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींनी असंच वागायला हवं. रणदीप, आम्हाला तुझा अभिमान आहे. आशा आहे की तू तुझ्या पत्नीला गर्दीतल्या गैरवर्तन आणि धक्काबुक्कीपासून सुरक्षित ठेवलं असेल.”, “संपूर्ण बॉलिवूडने खरोखरंच रणदीपकडून काही तरी शिकायला हवं…”, “मंडळाच्या सदस्यांनी त्यांना शांतपणे दर्शन घेऊ दिलं का? की त्यांनाही मानेला धरून पटकन बाहेर काढलं?”