शत्रुघ्न सिन्हा यांना झहीरसोबतच्या लग्नाबद्दल सांगितल्यानंतर 'अशी' होती पहिली प्रतिक्रिया
Shatrughan Sinha Reaction On Sonakshi- Zaheer Wedding : सोनाक्षी आणि झहीरने जून २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. मित्र आणि फॅमिलीच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. या आंतरजातीय विवाहामुळे सोनाक्षीवर फक्त तिचे चाहतेच नाही तर, तिचे लव्ह आणि कुश हे दोन्ही भाऊही तिच्यावर नाराज होते. शिवाय वडील शत्रुघ्न सुद्धा नाराज होते, अशी चर्चा होती. पण त्यांनी सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. दरम्यान, जेव्हा सोनाक्षीने वडिलांना झहीरसोबतच्या लग्नाबद्दल सांगितलं, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया कशी होती ? याबद्दलची माहिती तिने एका मुलाखतीतून दिली आहे.
हे देखील वाचा – आलिया भट्टपासून कुब्बरा सैतपर्यंत अभिनेत्रींचा पर्ल – लुक, पार्टीसाठी परफेक्ट फॅशन
सोनाक्षीने नुकतंच ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाच्या निर्णयावर पालकांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल खुलासा केला. वडिलांविषयी बोलताना सोनाक्षीने सांगितले की, “माझ्या आणि झहीरच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि फॅमिलीला आमच्या रिलेशनबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून माहिती होती. आम्ही जेव्हा वडिलांना लग्नाचा निर्णय सांगितला त्यावेळी ते खूपच आनंदी होते. “जब मियाँ बीवी राज़ी तो क्या करेगा काजी” (लग्न करण्यासाठी जर नवरा-बायको तयार असतील, तर त्यांना कोण अडवणार ?) अशी प्रतिक्रिया माझ्या वडिलांनी आमचा निर्णय ऐकल्यानंतर दिली होती. ते अनेकदा झहीरला भेटले आहेत. मुख्य बाब म्हणजे, त्यांना झहीर आवडतो सुद्धा ”
हे देखील वाचा – ‘पंजाबच्या लोकांनाही आवडेल,’ कंगना राणौतने ‘इमर्जन्सी’बाबत सांगितली भविष्यवाणी!
“झहीरचा आणि माझ्या वडिलांच्या वाढदिवसामध्ये एका दिवसाचाच फरक आहे. माझ्या वडिलांचा ९ डिसेंबर आणि झहीरचा १० डिसेंबरला असतो. त्यामुळे दोघांमध्ये एक समानता खूप आहे.” झहीरनेही मुलाखतीमध्ये सासरे शत्रुघ्न सिन्हा यांच्याविषयी आपले मत मांडले. तो म्हणाला, “मला त्यांचं आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचं फार कौतुक आहे. त्याच्या प्रती मला कायमच आदर असून त्यांच्याकडची माहिती ऐकून मला नेहमीच आश्चर्य वाटते. त्यांच्यासोबत फक्त काही तास जरी बोललो ना की असं वाटतं की, आपण एखाद्या विद्यापीठात शिकत आहोत.”
सोनाक्षीने आई पूनम सिन्हा यांच्या प्रतिक्रियेबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, “माझ्या आईला झहीरसोबतच्या नात्याबद्दल माहिती होती. आमच्या घरातील ती अशी पहिली व्यक्ती आहे, जिच्यासोबत मी या विषयावर मनमोकळेपणाने बोलले होते. माझ्या आई-वडिलांचा प्रेमविवाह झाल्यामुळे त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला.”