(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जियां’ हा चित्रपट २०२१८ रोजी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाला सहा वर्ष पूण झाले आहेत. कलर यलो प्रॉडक्शन्सने या आयकॉनिक लव्ह ट्रँगल स्टोरीचे ६ वर्षे साजरे केले आहे. या चित्रपटाची कथा कनिका धिल्लन यांनी लिहिली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाला चाहत्यांना खूप प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा, लेखन आणि गाणी खूप आवडली. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू, अभिषेक बच्चन आणि विकी कौशल मुख्यभूमिकेत होते. या तिघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. आणि आज या चित्रपटाला ६ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद निर्मात्यांनी साजरा केला आहे.
चित्रपटाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त, निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले “आम्हाला आठवण करून देणारा चित्रपट: प्रेम हे गुंतागुंतीचे नसते, लोक असतात! 6YearsOfManmarziyaan” असे लिहून चाहत्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. निर्मात्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनातील या चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. चाहत्यांनी या शेअर केलेल्या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.
अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटामध्ये तापसी पन्नू रुमी बग्गा, विक्की कौशल विकी संधू आणि अभिषेक बच्चन रॉबी भाटियाच्या भूमिकेत दिसत आहे. हे त्रिकूट अशा नात्यात गुंतले आहे जिथे गोष्टी गुंतागुंतीच्या असतात पण शेवटी रुमीला रॉबीचे प्रेम मिळते असे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.
सध्या आनंद एल राय समर्थित ” तुबाड ” प्रेक्षकांकडून पुनरावलोकने आणि प्रेम मिळवण्यासाठी सिनेमांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊस, कलर यलो, मध्ये 2025 मध्ये व्हॅलेंटाईन डे रिलीजसाठी ‘नखरेवाली’ देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय राय लवकरच ‘तेरे इश्क में’ या त्याच्या पुढच्या दिग्दर्शनाचे दिग्दर्शन करणार आहे जो धनुषसोबतचा तिसरा प्रकल्प चिन्हांकित करणार आहे.