Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कर्नाटक कुठेय ते मला माहिती नाही…” रश्मिका मंदान्नाचं विधान; काँग्रेस आमदाराकडून जीवे मारण्याची धमकी

'पुष्पा २' आणि 'छावा'च्या प्रसिद्धीचा आनंद घेत असताना अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्रीला एका कॉंग्रेसच्या आमदाराने खुलेआम धमकी दिली आहे. नेमकं अभिनेत्रीला धमकी का देण्यात आली, जाणून घेऊया...

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 03, 2025 | 08:11 PM
"कर्नाटक कुठेय ते मला माहिती नाही..." रश्मिका मंदान्नाचं विधान; काँग्रेस आमदाराकडून जीवे मारण्याची धमकी

"कर्नाटक कुठेय ते मला माहिती नाही..." रश्मिका मंदान्नाचं विधान; काँग्रेस आमदाराकडून जीवे मारण्याची धमकी

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या कमालीची प्रकाशझोतात आली आहे. ‘पुष्पा २’, ‘छावा’ आणि ‘सिंकदर’ चित्रपटामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘पुष्पा २’ आणि ‘छावा’च्या प्रसिद्धीचा आनंद घेत असताना अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्रीला एका कॉंग्रेसच्या आमदाराने खुलेआम धमकी दिली आहे. नेमकं अभिनेत्रीला धमकी का देण्यात आली, जाणून घेऊया…

श्रद्धा कपूरने कन्फर्म केलं नातं? मोबाईलच्या वॉलपेपरवर दिसला रूमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो

कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार रविकुमार गोवडा गनिगा माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, “अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने कन्नड भाषेचा अपमान केला आहे आणि तिला धडा शिकवला पाहिजे. ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातूनच रश्मिकाने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली आहे. परंतु गेल्या वर्षी आम्ही जो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला होता त्यासाठी रश्मिकाला निमंत्रण दिलं होतं. परंतु माझं हैदराबादमध्ये घर आहे आणि मला कर्नाटक कुठेय ते माहित नाही. माझ्याकडे वेळ नाही अशी कारणं देऊन रश्मिकाने येण्यास नकार दिला होता.”

Bengaluru | Congress MLA Ravikumar Gowda Ganiga says, “Rashmika Mandanna, who started her career with the Kannada movie Kirik Party in Karnataka, refused to attend the International Film Festival last year when we invited her. She said, ‘I have my house in Hyderabad, I don’t know… pic.twitter.com/uftmWfrMZ6

— ANI (@ANI) March 3, 2025

“याशिवाय आमच्या एका आमदारांनीही तिच्या घरी जाऊन तिला १०-१२ वेळा फिल्म फेस्टिव्हलचे निमंत्रण दिले होते. परंतु तरीही तिने मनाई केली. ज्या ठिकाणी रश्मिकाच्या करिअरची सुरुवात झाली आहे त्या कन्नड भाषेकडे तिने दुर्लक्ष केलं आणि निमंत्रणाला मनाई केली. त्यामुळे आम्ही तिला चांगलाच धडा का शिकवू नये?” अशाप्रकारे कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने सर्वांसमोर रश्मिकाला धमकी दिली. आता या प्रकरणी रश्मिका काय स्पष्टीकरण देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Be Happy Trailer: अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅपी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!

अभिनेत्रीच्या विधानावर आक्षेप घेतल्याबद्दल भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आमदार रविकुमार गौडा यांनी कोणत्याही परिस्थितीत संविधानाचा आदर केला पाहिजे असे म्हटले आहे. कॉंग्रेसच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, “तुम्ही गुंडाला राहुल काँग्रेसीपासून कधीच वेगळे करू शकत नाही. संविधानाचा गैरवापर करणारे राहुल गांधी यांच्या पक्षाचा हा अहंकारी आणि अतिशयोक्तीपूर्ण कर्नाटक आमदार एका अभिनेत्रीला धडा शिकवू इच्छितो. मी डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या यांना संविधान वाचायला सांगू इच्छितो.”

You can never separate goon from Rahul Congressman.

This pompous overblown #Karnataka MLA from constitution waving @RahulGandhi ‘s party, wants to “teach a lesson” to an actress.

I want to tell @DKShivakumar and @siddaramaiah to read up constitution – every citizen including… https://t.co/RV27NtFWqL

— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@RajeevRC_X) March 3, 2025

राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले की, “अभिनेत्रीसह प्रत्येक नागरिकाचे हक्क आहेत आणि तुमच्या गुंड खासदाराने हे विसरू नये की कायदा आणि नागरिकांच्या हक्कांचा आदर करणे ही त्याची जबाबदारी आहे. जर त्याला संविधानाचा धडा हवा असेल, तर मी/आम्हाला या गुंडाला शिकवण्यास आनंद होईल – मोफत – मला कधीही, कुठेही कॉल करा! #भ्रष्ट काँग्रेसबद्दलचे सत्य जाणून घ्या.”

निळू फुलेंच्या लेकीची मालिकाविश्वातून तडकाफडकी निवृत्ती, कारण सांगत केला खुलासा

Web Title: Rashmika mandana needs to be taught a lesson congress mla gets angry at the actress bjp also responded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 08:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.