सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा (Shraddha Kapoor) आज ३८वा वाढदिवस आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या श्रद्धाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्री शेवटची सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ‘स्त्री २’ चित्रपटात दिसली होती. अभिनयासोबतच श्रद्धा सध्या तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्रीचे आणि राहुल मोदीचा तुम्ही हा पुढचा फोटो पाहून रिलेशन कन्फर्म करुन टाकाल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा कायमच तिच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती अनेकदा चर्चेत राहते. श्रद्धा कपूरचे नाव अनेकदा राहुल मोदींसोबत जोडले गेले आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही विश्वास ठेवायला तयार व्हाल की ती राहुल मोदीला डेट करत आहे. सध्या सोशल मीडियावर श्रद्धाचा आणि राहुलचा एकत्र असलेला फोटो तुफान व्हायरल आहे. तो फोटो श्रद्धाने तिच्या मोबाईलच्या लॉक स्क्रीनला लावलेला आहे. तो पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्या दोघांच्याही रिलेशनची चर्चा होत आहे.
Zohra Jabeen: सलमान आणि रश्मिका मंदानाची चमकली जोडी, ‘सिकंदर’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची पहा झलक!
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांनी अद्याप ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केलेले नाही. पण दोघांमधील प्रेमाची सुरुवात चित्रपटांच्या सेटपासून झाली. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्रद्धाचा आणि राहुलचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये अभिनेत्री कोणाच्यातरी लग्नाला हजर राहण्यासाठी आली होती. विशेष म्हणजे यावेळी राहुल मोदीही तिच्यासोबत होते. दोघांनीही एकत्र कॅमेऱ्यासमोर हटके अंदाजात फोटोपोजेस दिले.