Marathi Actress Gargi Phule Is On Instagram Reel Stars And Industry
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची लेकही मराठी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्यांनी मराठी सिनेसृष्टीमध्ये काही निवडक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्रीने तिच्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधलेय. आपल्या गोड अभिनयाने सर्वांनाच आपलंसं करणाऱ्या गार्गी फुलेने मालिकाविश्वातून रिटायरमेंट घेतल्याचे मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. काही मोजक्याच मराठी मालिका आणि मराठी चित्रपटांत काम केल्यानंतर अभिनेत्रीने हा निर्णय घेतला आहे.
‘लेट्सअप मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री गार्गी फुले यांनी सांगितले की, “खरं सांगायचं तर मी, मालिकाविश्वातून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे. कारण मी मालिकाविश्वात १० वर्षे काम केलं आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी १० वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिले. खरं सांगायचं तर, कलाकारांसाठी मालिकेचं शेड्युल खूप विचित्र झालं आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिकाविश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्यच्या असो किंवा इतर, तर खूप त्रास होतो.” अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं शूटिंग पूर्ण, तीन भाऊ पुन्हा कल्ला करणार; चित्रपट केव्हा रिलीज होणार ?
दरम्यान गार्गी फुले यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’मालिकेतून गार्गी यांना महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळाली आहे. मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’या लोकप्रिय मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय त्यांनी काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. चित्रपटाबद्दल बोलायचं तर, त्यांनी ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ चित्रपटातही काम केलं आहे. पण आता मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
Sankranthiki Vasthunam चित्रपटाचा जबरदस्त व्हिडिओ रिलीज, व्हिज्युअल्स आणि व्हॉइस ओव्हरने केले थक्क!
गार्गी फुले यांच्याबद्दल सांगायचे तर, गार्गी फुले अभिनयाशिवाय राजकारणातही सक्रिय आहेत. तसंच आता त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. गार्गी यांनी स्वतःचं Solitude Holiday नावाचं ट्रॅव्हलिंग अॅपही लॉंच केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून आवडत्या कलाकारांसोबत चाहत्यांना देश-विदेशात फिरायला मिळणार आहे.