Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मिका मंदान्नाचा बॉयफ्रेंड कोण? अभिनेत्रीने बोलता बोलता ‘या’ खास गोष्टी सांगूनच टाकल्या…

रश्मिका गेल्या अनेक दिवसांपासून टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचं म्हटलं जातं होतं. या चर्चा कुठेतरी खऱ्या असल्याचं आता समोर येत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 28, 2025 | 04:10 PM
रश्मिका मंदान्नाचा बॉयफ्रेंड कोण? अभिनेत्रीने बोलता बोलता 'या' खास गोष्टी सांगूनच टाकल्या...

रश्मिका मंदान्नाचा बॉयफ्रेंड कोण? अभिनेत्रीने बोलता बोलता 'या' खास गोष्टी सांगूनच टाकल्या...

Follow Us
Close
Follow Us:

‘नॅशनल क्रश’ आणि ‘श्रीवल्ली’ अशा नावांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna)सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शिवाय अभिनेत्री सध्या विकी कौशलसोबतच्या ‘छावा’ चित्रपटामुळेही चर्चेत आहे. तर दुसरीकडे तिच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळेही ती चर्चेत आहे. या सगळ्या चर्चांमध्ये रश्मिकाचं अफेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रश्मिका गेल्या अनेक दिवसांपासून टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचं म्हटलं जातं होतं. या चर्चा कुठेतरी खऱ्या असल्याचं आता समोर येत आहे.

पद्म पुरस्कारांच्या घोषणेवर सोनू निगमची जाहीर नाराजी; म्हणाला, “त्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही..”

‘नॅशनल क्रश’रश्मिका मंदान्नाच्या ‘हँडसम हंक ’विजय देवरकोंडासोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. नुकतंच तिने अप्रत्यक्षरित्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. रश्मिका आणि विजय हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात आहे. डेटिंगच्या चर्चांदरम्यान, रश्मिका आणि विजय कधी मालदीव व्हॅकेशनला तर कधी डिनर डेटला एकत्र गेले आहेत. अनेकदा एकत्र स्पॉट झाले असले तरीही त्यांनी अद्याप त्यांचं नातं ऑफिशिअल केलेलं नाही. अलीकडेच एका मुलाखतीत विजयने तो अविवाहित नसल्याचं सांगितलं होतं. आता त्याने रश्मिकाने जोडीदार होण्याचे संकेत दिले आहेत.

 

रश्मिका मंदान्नाने ‘हॉलिवूड रिपोर्टर’शी बोलताना तिला पार्टनर असल्याचं सांगत ती सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचंही तिने तिच्या एक्सप्रेशन्समधून सांगितलं. मुलाखतीत रश्मिकाने सांगितलं की, “घर हे माझ्यासाठी हॅप्पी प्लेसपैकी एक आहे. त्यामुळे मला तिथे स्थिरता जाणवते. ते ठिकाण मला जमिनीच्या मुळाशी जोडून ठेवते. मला वाटतं की, यश येतं आणि जातं, पण ते कायमचं नसतं. पण घर कायम असतं. त्यामुळे मी त्या ठिकाणाहूनच काम करते. मला कितीही प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली, तरीही मी फक्त एक मुलगी आहे, फक्त एक बहीण आहे, फक्त एक जोडीदार आहे. मी त्या आयुष्याचा, माझ्या वैयक्तिक आयुष्याचा खरोखर आदर आणि सन्मान करते.”

‘छावा’ चित्रपटातील वादावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “आवडलं असतं, राजाला नवीन रुपात बघायला पण,…”

रश्मिका मंदान्नाने तिला तिच्या जोडीदारामध्ये किती गुण असावेत याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “असं म्हणतात की डोळे बोलतात. खरंतर डोळेच माणसाचं खरंपण समोर आणतं आणि माझा त्यावर विश्वास आहे. मी हसत राहते, त्यामुळे मी अशा लोकांकडे आकर्षित होते, ज्यांचा हसरा चेहरा आहे आणि अर्थातच कोणीतरी जो त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा आदर करतो, मग कोणीही असो. अशा लोकांवर विश्वास असतो आणि मी त्यांच्याकडे आकर्षित होते.” विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीता गोविंदम’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्यातल्या रिलेशनची जोरदार चर्चा होत होती. २०१९ मध्ये, जेव्हा विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटात एकत्र काम केले, तेव्हाही त्यांच्या रिलेशनच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर झाल्या. त्यांचा हा चित्रपटही हिट ठरला होता. चित्रपटाच्या सेटवरच रश्मिका आणि विजय एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असं म्हटलं जातं.

Web Title: Rashmika mandanna opens up on partner amid dating rumors with vijay deverakonda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 04:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.