
सर्वाधिक पसंती मिळालेल्या IMDb च्या Top 20 चित्रपटांमध्ये 'लापता लेडीज'ची बाजी; इतर चित्रपटांची परिस्थिती काय ?
‘लापता लेडीज’ला ऑस्कर 2025 मध्ये भारताची अधिकृत एंट्री मिळाली आहे. द फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्करमध्ये भारताच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे. ही बातमी ऐकून चित्रपटामधील संपूर्ण कलाकार खूश आहेत. रवी किशन यांनी चित्रपटामध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. श्याम मनोहर या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका त्यांनी साकारली आहे. ‘लापता लेडीज’ चित्रपटाची ऑस्कर 2025 मध्ये एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पोर्टलला मुलाखती दिल्या आहेत.
रवी किशन ह्यांनी श्याम मनोहर नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. हे पोलिस इन्स्पेक्टर पूर्ण दिवस पोलिस स्टेशनमध्ये पान खात बसलेले असतात. शुटिंग दरम्यानचा किस्सा त्यांनी सांगितला आहे. रेडिफ डॉट कॉमवर व्हायरल होत असलेल्या एका वृत्तानुसार त्यांनी मुलाखतीत सांगितले की, “मी या चित्रपटाच्या भूमिकेसाठी शुटिंगवेळी फिट राहण्यासाठी १६० पान खालले होते. नशीब मला पान खाण्याची सवय लागली नाही. माझं पात्र सदैव काही तरी खाताना दिसायला हवं, असं दिग्दर्शकांना वाटायचं. त्यांनी समोसाचं सजेशन दिलं होतं, पण मी त्यांना पान खायचा सल्ला दिला होता.”
मुलाखतीदरम्यान रवी किशन यांना खरोखरच तुम्ही शुटिंगवेळी १६० पान खाल्ले होते का ? असा प्रश्न विचारला होता. अभिनेता उत्तर देत म्हणाले, “होय, मी खरोखरंच शुटिंगवेळी तेवढे पान खाल्ले होते. पण, ही माझी पहिली ‘पान’ इंडिया फिल्म होती.” असं बोलून ते हसू लागले. रवी किशन यांच्यावर चित्रपटातील भूमिकेसाठी प्रचंड कौतुक करण्यात आले होते. कौतुकाबद्दल रवी म्हणाले, “माझं नशीब आहे, देव माझ्यासाठी कायमच दयाळू राहिला आहे. देवाने सदैव मला आनंदित ठेवलं आहे, घाबरवूनही ठेवलं आहे आणि रडतानाही ठेवलं आहे. माझ्या ३३ वर्षांच्या करियरमध्ये कोणत्याही भूमिकेला कोणत्याही भूमिकेला इतकं प्रेम आणि कौतुक मिळाले नव्हते.”
हे देखील वाचा – आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशनचे नवीन गरबा गाणं “जचडी” झाले लाँच!
पुढे मुलाखती दरम्यान अभिनेता म्हणतो, “माझी ओळख करणारा सीन मला फार आवडला आहे. ज्यामध्ये, मी पोलिस ठाण्यामध्ये बसून एका महिलेला ठूमरी गाऊन दाखवत आहे. (ठूमरी हा काही प्रमाणात शास्त्रीय गाणं आणि शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, ज्याची सुरूवात 19व्या शतकाच्या सुरूवातीला उत्तर भारतात झाली आहे.) या सीनला प्रेक्षकांकडून मला फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.”