फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांवरच आता ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात एकूण ८ स्पर्धक आहेत. या स्पर्धकांमधूनच टॉप ५ स्पर्धक मिळणार असून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेताही मिळणार आहे. अशातच सध्या बिग बॉसच्या घरात ‘फॅमिली विक’ सुरू आहे. या फॅमिली विक दरम्यान बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकाचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी येतात. आजच्या एपिसोडमध्ये सूरज चव्हाणच्या बहिणी आणि त्याची आत्या त्याला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात येणार आहेत.
हे देखील वाचा – आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशनचे नवीन गरबा गाणं “जचडी” झाले लाँच!
या टास्कचे नाव ‘फ्रीझ आणि रिलीज’ असं आहे. प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांसाठी हा टास्क असतो. या टास्क दरम्यान, जेव्हा बिग बॉस फ्रीझ सांगितली तेव्हा सर्व स्पर्धक जिथे असतील तिथे उभे राहतील आणि हालचाल न करता स्टॅच्यूच्या पोझमध्ये उभे राहतील. यावेळी बिग बॉस घरातील स्पर्धकाच्या घरच्यांना घरामध्ये पाठवतात. आता ह्या टास्कचे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या टास्क दरम्यान, आजच्या एपिसोडमध्ये सोशल मीडिया एन्फ्लूएंसर सूरज चव्हाणच्या बहिणी आणि आत्या बिग बॉसच्या घरात येणार आहेत. फ्रीझ आणि रिलीज या टास्कवेळी सूरज चव्हाणचे नातेवाईक घरामध्ये आले होते. यावेळी आपल्या कुटुंबाला पाहताच सूरज भावुक झाला आणि त्यांना मिठी मारली.
शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, सूरजची आत्या आणि बहिणींची घरात एन्ट्री होते. दरवाजा उघडताच सर्व आत येतात. सूरज दारासमोरच उभा असतो. सूरजच्या बहिणी आणि आत्या घराच्या आत येताच त्यांनी सूरजला मिठी मारली. यावेळी सूरजच्या आत्याने सूरजचे खूप लाडही केले. त्याचे हे लाड पाहून आणि सूरजच्या घरातील नातेवाईकांना भेटून सर्वच सदस्यांना आनंद झाला. यावेळी सूरजच्या नातेवाईकांनी घरातल्या इतर स्पर्धकांसोबतही संवाद साधला. सूरजच्या कुटुंबाला बघून सर्वांचेच डोळे पाणावतात.
हे देखील वाचा – अंशुल गर्गच्या संगीताची ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री आहे चाहती!
प्रोमोमध्ये, सूरज त्याच्या बहिणीला आणि आत्याला घराचा फेरफटका मारवतो. “तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालंय”, अशी प्रतिक्रिया सूरजच्या बहीणीने दिली. त्यानंतर सर्व स्पर्धक गार्डन एरियात एकत्र येऊन सूरजच्या फॅमिलीसोबत बँचवर बसून गप्पा मारतात. यावेळी निक्की सूरजच्या फॅमिलीला मिठी मारते. सूरजच्या फॅमिलीने दिलेलं अस्सल प्रेम पाहून घरातील सर्व सदस्यांचे डोळे पाणावलेले दिसतात.






