रवी किशन : भोजपुरी चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रवी किशन (Ravi kishan) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अपर्णा सोनी या महिलेने अभिनेता रवी किशन हे तिचे पती आहेत असे वर्णन केले आहे. या महिलेचा आरोप आहे की, तिला एक मुलगी सुद्धा आहे आणि त्या मुलीचे नाव शिनोवा असून तिचे वडील रवी किशन हे तिला आता स्वीकारत नाहीत. अपर्णा सोनी हा महिलेच्या आरोपानंतर रवी किशन यांची पत्नी प्रीती शुल्का हिने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याचदरम्यान चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उर्फ केआरकेने (KRK) X वर एक पोस्ट शेअर केली आहे. यांच्या या पोस्टमुळे या चर्चाना उधाण आले आहे.
चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उर्फ केआरकेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये रवी किशन हे त्यांची पत्नी आणि मुलीसोबत दिसत आहेत. केआरकेने दावा केला आहे की चित्रांमध्ये दिसणारी मुलगी तीच शिनोवा आहे जी रवी किशन आता स्वीकारत नाही. रवी किशनवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रवी किशनची पत्नी प्रीती शुक्ला हिनेही ब्लॅकमेलिंगची तक्रार पोलिसांकडे केली आहे. प्रीती शुक्ला म्हणाल्या की, हे सर्व रवी किशन यांची प्रतिमा डागाळण्यासाठी करण्यात आले आहे.
Ravi Kishan with his daughter #Shinova whom he doesn’t want to accept now. pic.twitter.com/HOO6SsCtIN
— KRK (@kamaalrkhan) April 18, 2024
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘एक वर्षापूर्वी या महिलेविरुद्ध ब्लॅकमेलिंगची तक्रारही मुंबई पोलिसांत दाखल करण्यात आली होती. निवडणुकीच्या वेळी आरोप-प्रत्यारोप करून निवडणूक लढविणाऱ्या रवी किशन यांची प्रतिमा डागाळण्याचा डाव होता. रवी किशन यांच्यावर आरोप करण्याच्या कटात सपा नेत्याचा हात आहे. सपा अधिकारी विवेक आणि एक YouTuber खुर्शीद खान हे या कटाचे मुख्य सूत्रधार आहेत. या प्रकरणात अपर्णा सोनी यांचा पती, मुलगी आणि मुलगाही आरोपी आहेत. अपर्णाच्या लग्नाला ३५ वर्षे झाली आहेत. अपर्णा सोनी यांनी धमकी दिली आणि सांगितले की तिचे आणि तिच्या साथीदारांचे अंडरवर्ल्ड माफियांशी संबंध आहेत. आणि जर तू आमचे म्हणणे ऐकले नाहीस तर मी तुझ्या पतीला माझ्यावर बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवून तुझी बदनामी करीन आणि तुझी प्रतिमा मलिन करीन, हे ध्यानात ठेवा.