Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 : दोन दशकांपूर्वी म्हणजे तब्बल 25 वर्षांपूर्वी स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर एकाच मालिकेची चर्चा जास्त रंगली ती म्हणजे क्योंकी सांस भी कभी बहु थी. सध्या या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. नव्या कोऱ्या या दुसऱ्या सिझन सर्वत्र चर्चा होताना देखील दिसत आहे. अशातच आता मालिकेती विराणी कुटुंबात नवं वादळ येणार असल्याच पुढच्या काही भागांत दिसणार आहे.
25 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 सालामध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा चाहता वर्ग आजही मोठ्या प्रमाणात. मालिकेच्या प्रदर्शित झालेल्या दोन भागांबद्दल चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मालिकेतील जुन्या भागांमधील काही पात्रांची आठवण या नव्य़ा सिझनमध्ये चाहत्यांकडून होत आहे. याबाबत आता आणखी एक ट्विस्ट मालिकेत येत आहे. लवकरच विराणी कुटुंबात खलनायकाची एन्ट्री होणार आहे. याबाबतची माहिती छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याने दिली आहे.
‘हा’ अभिनेता साकारणार आहे खलनायकाची भूमिका
हिंदी मालिका विश्वातील नावाजलेला अभिनेता अंकित भाटीया याने नुकतीच माध्यमांना दिलेली मुखात चर्चेत आहे. अंकित भाटीया मालिकेच्या या दुसऱ्या सिझनमध्ये खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. अंकितच्या व्यक्तिरेखेचं नाव विरेन पटेल असं असणार आहे. हा विरेनमुळे विराणी कुटुंबाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.
काय म्हणाला अंकित ?
माध्यमांशी संवाद साधताना अंकित म्हणाला की, “मी गेल्या चार वर्षांपासून भाग्य लक्ष्मी मालिकेत करत होतो. बालाजी टेलिव्हिजनचा भाग असल्याने मला माहित होते की हे कास्टिंग होणार आहे. मी निर्मात्यांशी आणि कास्टिंग लोकांशी बोललो. त्यांनी मला ऑडिशन देण्यास सांगितले.पहिल्या दोन भूमिकांसाठी मला नकार मिळाला. त्यानंतर मला विरेन या खलनायकाच्या पात्रासाठी माझी निवड करण्यात आली आहे, असं मला निर्मात्यांनी फोन करुन सांगितल.
अंकित पुढे असंही म्हणाला की , मालिकेची मुख्य नायिका स्मृती इराणी यांच्याबरोबर माझा सीन नुकताच शुट झाला आहे. त्यांच्याबरोबर काम कऱण्याचा अनुभव अत्यंत सुंदर होता. त्या कलाकार असण्याबरोबर एक मंत्री देखील आहे. लहानपणापासून ज्यांना पाहत आलो आहे त्यांच्याबरोबर काम करण्य़ाची संधी मिळणं खूप सुखद अनुभव होता असं अंकितने सांगितलं आहे. सीन शुट झाला तो दिवस खूप छान होता. मालिकेच्या मिटींगसाठी आम्ही सर्वजण एकता कपूर यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो तो अनुभव सुद्धा आनंददायी होता. अंकितची ही नवी व्यक्तिरेखा मालिकेत काय नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे, याकडे आता चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.