जगप्रसिद्ध सारंगी वादक पंडित राम नारायण यांचं निधन, वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारतीय संगीतसृष्टीतून दु:खद बातमी येत आहे. भारतीय संगीतकार आणि सारंगी वादक राम नारायण यांचे निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे. फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगभरातील लाखो रसिकांना पंडित राम नारायण यांनी मंत्रमुग्ध केले आहे. राम नारायण यांचे निधन ८ नोव्हेंबर रोजी रात्री मुंबईत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम नारायण यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
हे देखील वाचा – कंगना रणौतच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आजीचे झाले निधन!
राम नारायण यांचा जन्म २५ डिसेंबर १९२७ रोजी उत्तर-पश्चिम भारतातील उदयपूरजवळील आमेर गावात झाला. त्यांचे आजोबा बगाजी बियावत हे आमेरचे गायक होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम नारायण आणि त्यांचे आजोबा सागद दानजी बियावत उदयपूरच्या महाराणाच्या दरबारात गाायचे. ते पंडित म्हणून ओळखले जायचे. राम नारायण हे एक भारतीय संगीतकार होते ज्यांनी सारंगीला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एकल वाद्य म्हणून लोकप्रिय केले. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले यशस्वी सारंगी वादक बनले. त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावत हे शेतकरी आणि गायक होते, नथुजींनी दिलरुबा वाद्य वाजवायचे आणि नारायण यांची आई संगीत प्रेमी होती.
संगीतकार राम नारायण यांची मुळ भाषा राजस्थानी होती. त्यानंतर ते हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना कुटुंबातील गंगा गुरू, वंशावळशास्त्रज्ञ यांनी सोडलेली एक छोटी सारंगी मिळाली होती. त्यांना त्यांच्या वडिलांनी ते स्वत: शिकलेले सारंगी शिकवले. नंतर नारायण यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला सारंगी शिकवण्यासाठी जयपूरच्या सारंगी वादक मेहबूब खानकडे सारंगी शिकवण्याची मागणी केली होती. राम नारायण यांनी सारंगी वादक आणि गायकांच्या हाताखाली सखोल अभ्यास केला. नंतर तरूणवयात संगीत शिक्षक आणि यशस्वी संगीतकार म्हणून काम केले. त्यांनी १९४४ मध्ये ऑल इंडिया रेडिओ, लाहोर येथे गायकांसाठी संगीतकार म्हणून काम केले.
१९४७ मध्ये भारत स्वातंत्र्यानंतर ते दिल्लीला गेले, परंतु संगीताच्या पलीकडे जाण्याच्या इच्छेने आणि त्यांच्या सहाय्यक भूमिकांमुळे निराश होऊन, नारायण भारतीय चित्रपटात काम करण्यासाठी १९४९ मध्ये मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर नारायण यांनी १९५६ मध्ये कॉन्सर्ट सिंगल आर्टिस्ट बनले. त्यानंतर त्यांनी भारतातील अनेक प्रमुख म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आपलं गाणं सादर केले आहे. त्यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड केले. २००५ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.