प्रेक्षकांसह समीक्षकांच्या पंसतीस उतरलेला कन्नड चित्रपट कांतारा सध्या ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही रिलीज करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद बघता या चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार का असं प्रश्न उपस्थित करण्याता येत होता. ज्याला नुकतचं दिग्दर्शक रिषभ शेट्टी उत्तर दिलंय. कांतारा कन्नड चित्रपट यापूर्वीच हिंदीत डबमुळे आता हिंदी रिमेकची शक्यता नाही आणि तो बनवण्यात रसही नसल्याचं त्यानं म्हण्टलं आहे.
[read_also content=”सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद https://www.navarashtra.com/maharashtra/spontaneous-response-to-ekta-daud-on-sardar-vallabhbhai-patels-birth-anniversary-nrab-340633.html”]
कांताराच्या हिंदी व्हर्जनला जबरदस्त यश मिळाले आहे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीनेही चांगला व्यवसाय केला आहे. हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या कंटाराने दोन आठवड्यांत सुमारे 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि तिसऱ्या आठवड्यातही चांगले कलेक्शन होण्याची अपेक्षा आहे. मात्र, चित्रपटाचा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टीला आपला चित्रपट हिंदी रिमेक बनवायचा नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट हिंदीत बनवणार का, असे विचारले असता, कोणत्या अभिनेत्याच्या भूमिकेत बसेल. या प्रश्नाच्या उत्तरात ऋषभ म्हणाला, ‘अशी पात्रे साकारण्यासाठी तुम्हाला मुळांवर आणि संस्कृतीवर विश्वास ठेवावा लागेल.’ तो म्हणाला की, बॉलीवूडमध्ये अनेक मोठे स्टार्स आहेत, पण त्यांना या चित्रपटाचा रिमेक नको आहे.
KGF: 2 नंतर आता दुसरा सर्वात मोठा कन्नड चित्रपट म्हणून ओळखला जाणारा कांतारा या चित्रपटाला इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा काही विचार नव्हत असा खुलासाही ऋषभ शेट्टीने केला आहे. पॅन इंडिया स्तरावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय नंतर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट ज्या परंपरा आणि संस्कृतीशी निगडीत आहे त्या भागासाठी चित्रपट बनवण्याला आमचे प्राधान्य होते. असेही तो म्हणाला.