Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर रितेश देशमुखची पोस्ट, केली न्यायाची मागणी; म्हणाला…

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त ऐकून अवघा देश हादरला आहे. राजकीय क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच स्तरातून बाबा सिद्दीकींच्या हत्येवर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 13, 2024 | 03:17 PM
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर रितेश देशमुखची पोस्ट, केली न्यायाची मागणी; म्हणाला...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर रितेश देशमुखची पोस्ट, केली न्यायाची मागणी; म्हणाला...

Follow Us
Close
Follow Us:

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री (१२ ऑक्टोबर) गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक गोळीबार केला असून मुंबईच्या बांद्रा पूर्वमध्ये खेरवाडी परिसरात ही घटना घडलीये. या घटनेनंतर बाबा सिद्दिकी यांना उपचारासाठी जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र छातीत गोळी घुसल्यामुळे त्वरीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे वृत्त कळताच राज्यातील अनेक महत्वाचे राजकीय नेते त्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटीही रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.

हे देखील वाचा – मुलगी झाली रे! मसाबा गुप्ताच्या घरी झाले दुर्गाचे आगमन

घटनेची माहिती कळताच, सलमान खानने ‘बिग बॉस’चं शूटिंग रद्द करून तो सुद्धा लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला. संजय दत्त, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सोनाक्षीचा पती झहीर इक्बाल, त्याचे वडील इक्बाल रतनसी, वीर पहारिया असे अनेक सेलिब्रिटी शनिवारी रात्रीच लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. याठिकाणी बाबा सिद्दीकींच्या कुटुंबीयांची सगळ्यांनी भेट घेऊन त्यांच्या दु:खात सहभागी झाले. बाबा सिद्दीकींच्या हत्येचे वृत्त ऐकून अवघा देश हादरला असून राजकीय क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच स्तरातून बाबा सिद्दीकींच्या हत्येवर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 

Extremely saddened and shocked beyond words to learn about the tragic demise of Shri #BabaSiddique ji – My heart goes out to @zeeshan_iyc and the entire family- May god give them strength to brave this difficult time. The perpetrators of this horrific crime must be brought to… pic.twitter.com/zjNLnspbrp

— Riteish Deshmukh (@Riteishd) October 12, 2024

बिग बॉस मराठी ५ चा होस्ट, अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने बाबा सिद्दिकींच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने न्यायाची मागणी केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये रितेश देशमुख म्हणतो, “बाबा सिद्दीकी यांच्या निधनाचे वृत्त कळताच मला प्रचंड धक्काच बसला. त्यांच्या जाण्याने मला मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझे दु:ख आणि संवेदना आहेत. या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबीयांना सामना करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो. बाबा सिद्दिकी यांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होऊन याप्रकरणी न्याय मिळाला पाहिजे… गुन्हेगारांना अद्दल घडलीच पाहिजे.”

हे देखील वाचा – आलिया भट्टचा “जिगरा” सिनेमावर प्रेक्षक उधळत आहेत पैसे! वाचा दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन

बाबा सिद्दिकी यांचे फक्त राजकीय नेत्यांसोबतच नाही तर, बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या सेलिब्रिटींसोबतही त्यांचे फार उत्तम संबंध होते. त्यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय राहायची. त्यांच्या इफ्तार राजकीय नेत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थिती लावायचे.

Web Title: Riteish deshmukh demands justice after baba siddique shot dead shares post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 03:17 PM

Topics:  

  • baba Siddique
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

मराठमोळ्या Riteish Deshmukh ने गमावली मोठ्या भावाइतकी जवळची व्यक्ती, शेअर केली भावनिक पोस्ट
1

मराठमोळ्या Riteish Deshmukh ने गमावली मोठ्या भावाइतकी जवळची व्यक्ती, शेअर केली भावनिक पोस्ट

बाबा सिद्दीकींच्या खात्यातील रक्कम चोरण्याचा मोठा डाव; मोबाईल नंबर अ‍ॅक्टिव्हेट करून बँक खातं…
2

बाबा सिद्दीकींच्या खात्यातील रक्कम चोरण्याचा मोठा डाव; मोबाईल नंबर अ‍ॅक्टिव्हेट करून बँक खातं…

महाराष्ट्राचे दादा-वहिनी रितेश-जेनिलियाचे Parenting का आहे खास; असे संस्कार जे सेलिब्रिटींनी शिकावेच
3

महाराष्ट्राचे दादा-वहिनी रितेश-जेनिलियाचे Parenting का आहे खास; असे संस्कार जे सेलिब्रिटींनी शिकावेच

Baba SiddiqueMurder Case : मोठी अपडेट; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मोबाइल क्रमांक वापरून…..
4

Baba SiddiqueMurder Case : मोठी अपडेट; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मोबाइल क्रमांक वापरून…..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.