रितेश देशमुखने गमावला जवळचा माणूस (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक भावनिक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. रितेशने सांगितले की तो त्याच्या मॅनेजरला त्याच्या कुटुंबाचा एक भाग आणि मोठ्या भावासारखा मानत असे. आता त्याच्या अचानक जाण्याने रितेशला अत्यंत दुःख झाले आहे. रितेश देशमुखने पुढे सांगितले आहे की जेव्हा त्याने ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हापासून राजकुमार तिवारी त्याच्यासोबत मॅनेजर म्हणून होते.
रितेश देशमुखची भावनिक पोस्ट
हाऊसफुल ५ चा अभिनेता रितेश देशमुखने मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने मॅनेजर राजकुमार तिवारी यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या फोटोसोबत रितेशने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, ‘हे जाणून खूप दुःख झाले आहे. राजकुमार तिवारीजी आता राहिले नाहीत हे पाहून माझे मन तुटले आहे. ते माझे मार्गदर्शक, माझे मोठे भाऊ आणि माझे कुटुंब होते.’
Katrina Kaif Birthday: दर 2 वर्षांनी कतरिनाला का देश बदलावा लागत होता, मुंबईत एका क्षणात पालटले नशीब
पदार्पणापासून होते एकत्र
रितेशने व्यक्त केले दुःख
माझ्या पदार्पणापासूनच मॅनेजर तिवारी माझ्यासोबत होते असे रितेशने सांगितले आहे. रितेश देशमुखने पुढे लिहिले की, ‘राजकुमार तिवारीजींनी माझ्या पदार्पणापासूनच माझ्या कामाची काळजी घेतली होती. प्रत्येक कठीण काळात ते माझ्या पाठीशी उभे राहिले.’ अभिनेत्याने मॅनेजरच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि लिहिले, ‘तिवारीजी मी तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवेन. कुटुंबाप्रती – त्यांचे मुलगे सिद्धार्थ आणि सुजीत यांच्याप्रती संवेदना.’
दिग्गजांसह केले होते काम
रितेश देशमुखने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये त्याच्यासोबत जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत होती. तेव्हापासून रितेशचे मॅनेजर राजकुमार तिवारी त्याच्यासोबत होते. असे म्हटले जाते की त्यांनी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते फिरोज खान आणि विनोद खन्ना यांच्यासोबतही काम केले आहे.
रितेश देशमुखने स्वतः मॅनेजरचा त्या दोन दिग्गजांसोबतचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याने फोटोला कॅप्शन दिले आहे, ‘माझे मॅनेजर राजकुमार तिवारी आमच्या इंडस्ट्रीतील दोन रॉकस्टार विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबत.’ सध्या रितेशच्या कुटुंबावर नक्कीच दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे त्याच्या पोस्टवरून समजून येत आहे.
रितेशची पोस्ट
My manager ( my pillar 🏋🏽🎯💪) Mr Raajkumar Tiwari with the two rockstars of our industry. #VinodKhanna ji & #FirozKhan Saab. @YuvrajEnt – pic.twitter.com/BX42CkN5WR
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 28, 2017