रितेश देशमुखची मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत खास पोस्ट
Riteish Deshmukh On Maratha Reservation Protest News in Marathi: ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक कितीही दिवस मुंबईत राहण्यास तयार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत ते मुंबई सोडणार नाहीत अशी भावना मराठा समाजाने व्यक्त केली आहे. राजकीय क्षेत्रासह आता मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात मनोरंजनविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याचदरम्यान आता अभिनेता रितेश देशमुख यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
यावेळी रितेश देशमुख म्हणाला, सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र ….
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो… pic.twitter.com/1lIELovdJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 29, 2025
आज (३०) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सुरुवातीला मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आली होती. मनोज जरांगेंच्या मागण्यांसदर्भात सरकार काय भूमिका काय घेत? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात अनेक ओबीसी नेते देखील बोलताना पाहायला मिळाले आहेत. ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंच्या मागण्यांना कडाडून विरोध केला आहे.