‘आम्हाला आरक्षण हवय, राजकारण नकोय, पण मुख्यमंत्र्यांना….’, आता काय आहे मनोज जरांगेंची नवीन मागणी? (फोटो सौजन्य- X)
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai News in Marathi : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होत असून वातावरण चांगलंच तापलेलं आहे.
“मनोज जरांगे पाटील यांचा आज (30 ऑगस्ट) उपपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, सर्व मागण्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यांनी त्या लागू कराव्यात. कारण उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी यायला सुरुवात होते. आज दुसऱ्या दिवसापासून ते सुरु झालं आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आज आझाद मैदानावर त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काही मराठा आंदोलक आझाद मैदानाजवळ मुंबई महानगरपालिकेसमोर निदर्शने करत आहेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ईस्टर्न फ्री वेव्हर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहे. “दोन दिवसांचा प्रवास आणि दोन दिवस उपोषण त्यामुळे शरीरावर परिणाम होतात. उपोषणास नाही हा दुसरा दिवस आहे. हा सरकारचा निर्णय आहे, कृपया मागणीची त्वरित अंमलबजावणी करा. गोरगरीब मराठ्यांचा आदर करा. त्यांचा अपमान करू नका” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“तुमचे काही मंत्री म्हणतात की, एकाच काढून एकाला देऊ शकत नाही. आम्ही असे म्हणत नाही की त्यांचं काढून आम्हाला द्या, महाराष्ट्रात गैरसमज पसरवू नका.आमच आहे ते आम्हाला द्या म्हणतोय. त्यांचं काढून घेणं म्हणजे काय, ओबीसींच उदहारणार्थ आरक्षण 32 टक्के आहे, त्याच्यातलं 20 टक्के आम्ही काढून घेतलं, तर काढून घेणं म्हणतात. त्यांना फक्त 10 टक्के ठेवणं काढून घेणं म्हणतात. मराठा-कुणबी एक आहेत, हे आम्ही म्हणतो. गोंधळ निर्माण करू नका. उगाच संभ्रम निर्माण करु नका. राज्य अस्थिर करण्याचं काम होऊ नये ही अपेक्षा आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईतील वाहतूकस कोंडीच्या समस्येवर जरांगे पाटील म्हणाले, “पोरांना माझी विनंती आहे की, तुम्ही तुमची गाडी पोलिसांनी दिलेल्या पार्किंगमध्ये पार्क करा.” “आम्हाला आरक्षण हवे, राजकारण नको. मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण कारायचं आहे, त्यांना आरक्षण द्यायचं नाहीय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“ज्या ज्या स्पॉर्टवर पोरं असतील, त्यांना विनंती आहे की, तुम्ही संयम ठेवा. आपण वाट बघू, गाडी रस्त्यावर नेण्याऐवजी पोलिसांनी दिलेल्या मैदानात गाडी पार्क करा” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. “आता सगळ्या मुंबईत मराठा झालेत. त्यांनी मुंबईत येऊ नये का?. ते वाईट करणार नाहीत, माझा शब्द आहे. पोरांना सांगण आहे, अजिबात वाईट करायचं नाही. सगळ्या मुंबईत मराठा पसरलेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.