अल्लू अर्जुनचा समावेश असलेल्या ‘पुष्पा पुष्पा’ या गाण्याने सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये 100 दशलक्ष व्ह्यूज आणि 2.26 दशलक्ष+ लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे. तर ‘द कपल सॉंग’ने अवघ्या काही दिवसांतच 53M व्ह्यूज आणि 1.16 मिलियन लाईक्स मिळवले आहेत. गाणी रिलीझ झाल्यापासून लाखो लोकांनी याला प्रेम दिलं. अलीकडेच एका जर्मन व्यक्तीने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यावर व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हि गाणी केवळ व्हायरल झालेली नाहीत तर ती अनेकांच्या चाहत्यांची आवड बनली आहेत. अलीकडेच ‘पुष्पा पुष्पा’ने सर्वाधिक वाजलेल्या ५० तेलुगु गाण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘द कपल सॉंग’ द्वारे, रॉकस्टार डीएसपीने पुन्हा एकदा आपली अपवादात्मक प्रतिभा आणि जागतिक प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची क्षमता सिद्ध केली आहे. संगीतकाराच्या चाहत्यांना खात्री आहे की पुरस्कार विजेते संगीतकार ‘पुष्पा 2: द रुल’साठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार डीएसपी मिळवतील.
[read_also content=”सनी लिओन-स्टारर ‘कोटेशन गँग’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/entertainment/sunny-leone-starrer-quotation-gang-will-meet-the-audience-on-this-day-542110/”]
कामाच्या आघाडीवर रॉकस्टार डीएसपीचे हात या वर्षीच्या प्रोजेक्ट्सच्या रोमांचक लाइनअपने भरलेले आहेत. 15 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ‘पुष्पा 2’ व्यतिरिक्त, त्याच्या संगीतमय उपक्रमांमध्ये सुर्याचा ‘कंगुवा’, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, धनुषचा ‘कुबेरा’ या चित्रपटांचा समावेश असून, नागा चैतन्यचा ‘थंडेल’ या चित्रपटासाठी काम करताना दिसणार आहे. असे डीएसपीचे प्रोजेक्ट्स चाहत्यांसाठी येणार असून, गाण्यांची बरसात होणार आहे.