Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार ‘गोपी बहू’, मॅटर्निटी शूटचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

टिव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने मॅटर्निटी शूटचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मोकळे केस आणि साध्या मेकअपसह देवोलिना अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2024 | 02:09 PM
वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार 'गोपी बहू', मॅटर्निटी शूटचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार 'गोपी बहू', मॅटर्निटी शूटचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

साथ निभाना साथियामधील गोपी बहू फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून चाहत्यांनी देवोलिना भट्टाचार्जीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने गेल्या महिन्यातच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत. तिने लेटेस्ट मॅटर्निटी शूटसह तिचा गरोदरपणाचा अनुभव शेअर केला आहे.

हेदेखील वाचा- Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात नवी जोडी! चाहत पांडेने या हँडसम अभिनेत्याबद्दल दिली पसंतीची कबुली

2024 मध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आणि पहिल्यांदाच आई होण्याचा अनुभव घेतला. नताशा दलाल, ऋचा चढ्ढा आणि दीपिका पदुकोण यांच्याशिवाय टीव्हीवरील अनेक सुंदरीही आई झाल्या आहेत. या यादीत टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीचेही नाव लवकरच सामील होणार आहे. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)

शानवाज शेखसोबतच्या लग्नाच्या दोन वर्षानंतर देवोलिना भट्टाचार्जी आई होणार आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अनेक दिवसांपासून बातम्या सुरु होत्या, मात्र तिने यावर मौन पाळले होते. गेल्या महिन्यातच तिने एका पोस्टद्वारे ती आई होणार असल्याची घोषणा केली होती. आता ती लवकरच तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. प्रसूतीपूर्वी तिने मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर केले आहेत.

देवोलीनाने मॅटर्निटी शूट केले

देवोलीना भट्टाचार्जीने बेबी शॉवरनंतर मॅटर्निटी शूट केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, देवोलिना खुर्चीवर बसून तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने थाई स्लिट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, जो फ्रिल गाउनसह जोडलेला आहे.

साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री देवोलिनाने मोकळे केस आणि कमीत कमी मेकअपने आपला लूक साधा ठेवला आहे. तिच्या चेहऱ्यावरील गरोदरपणाची चमक तिचे सौंदर्य वाढवत आहे. या फोटोशूटवेळी अभिनेत्रीने हातात पांढऱ्या फुलांचा पुष्पगुच्छ घेतला आहे. हे फोटो शेअर करताना देवोलिना भट्टाचार्जीने प्रेग्नेंसीच्या टप्प्यातील अनुभव शेअर केला आहे. देवोलिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक किक मला आठवण करून देते की प्रेम येत आहे. प्रेग्नेंट मुमेंट.”

हेदेखील वाचा- Bigg Boss 18 : सलमान खान अविनाश मिश्राचा वकील? सोशल मीडियावर केलं ट्रोल

लग्नासाठी ट्रोल झाली होती देवोलिना

देवोलिना भट्टाचार्जीने 2022 मध्ये शानवाजसोबत कोर्ट मॅरेज केले होते. दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. शनवाजसोबत लग्न केल्यामुळे देवोलीनाचे कुटुंबीय तिच्यावर नाराज असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तिचा भाऊ तिच्याशी अनेक महिने बोलतही नव्हता. मात्र, आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. 39 वर्षांची देवोलीना लवकरच तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे आणि नवीन आयुष्य सुरू करणार आहे.

Web Title: Saath nibhaana saathiya fame devoleena bhattacharjee maternity photo shoot viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 02:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.