फोटो सौजन्य - JIO Cinema
करणवीर मेहरा-चाहत पांडे : बिग बॉस १८ चा दुसरा आठवडा नुकताच समाप्त झाला आहे, यामध्ये घरामधील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. टेलिव्हिजनवरचे प्रसिद्ध अभिनेता करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा हे दोन स्पर्धक मागील दोन आठवडे वादामध्ये आणि चर्चेत राहिले. मागील दोन आठवड्यापासून या दोघांमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला आहे. स्पर्धक आता स्वत:ला प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. अलीकडेच वीकेंड का वारमध्ये घरातील सदस्यांना सलमानच्या रागाचा सामना करावा लागला होता. आता बिग बॉस १८ चा नवा प्रोमो समोर आला आहे. बऱ्याच सीझनमध्ये अनेक स्पर्धकांचे प्रेम प्रकरण पाहायला मिळाले आहे, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा बऱ्याच जोड्याना पसंत करत आहेत.
सोशल मीडियावर एक प्रोमो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, यामध्ये बिग बॉसचा होस्ट सलमान खान चाहत पांडेला प्रश्न करतो की तू घरामध्ये आल्यापासून सगळ्यांना सांगत आहे की, मला लग्न करायचं आहे. यावर नंतर सलमान म्हणतो की मग तुला लग्न करायचं आहे तर कसा मुलगा तुला हवा आहे. यावर चाहत पांडे सलमान खानला सांगते मला करणवीर सारखा मुलगा हवा आहे. यावर चाहत पांडे लाजते. त्यानंतर करणवीर मेहरा उठतो आणि त्याची बॉडी दाखवत असतो. त्यानंतर श्रुतिका अर्जुन सलमान खानला सांगते की मला वाटत आहे की, चाहत पांडेला करणवीरवर क्रश आहे यावर सलमान खान आणि सगळेच घरांमधील सदस्य हसतात.
Chahat x Karanveer ?? 🤣#ShrutikaArjun : mujhe lagta hai #ChahatPandey ko #KaranveerMehra pe crush hai !!
Chahat blushes !!
KV : mai bhi tumko pasand karta hu 😂
idhar toh aisa lag raha jodi banayi jaa rahi hai inn dono ki..#BiggBoss18 #BB18pic.twitter.com/nz2ZaS0S2Y
— 𝐒𝐞𝐧𝐩𝐚𝐢🥂 (@Oyye_Senpai) October 20, 2024
आजच्या भागामध्ये करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे. यांच्यामध्ये झालेला वाद हा एवढा मोठा असतो की तो वाद धक्काबुक्कीपर्यत जातो. त्यामुळे आजचा भाग प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन असणार आहे. त्याचबरोबर अंकिता लोखंडे, विकी जैन, सुदेश लहरी आणि कृष्णा अभिषेक हे घरामध्ये येणार आहेत. त्यामुळे आजच्या भागामध्ये वाद आणि कॉमेडीने भरलेला हा भाग असणार आहे.