फोटो सौजन्य - JIO Cinema
सलमान खान : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉस हा असा रिऍलिटी शो आहे, या शोला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पसंती देतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्यांची मते देखील देत असतात. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १८ च्या वीकेंड का वारमध्ये खूप ड्रामा झाला होता. एकीकडे अनेक कुटुंबीयांना सलमान खानच्या रोषाला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे काहींनी त्याच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही केला. कालच्या विकेंडच्या वॉरमध्ये सलमान खानने बिग बॉसच्या घरामधील काही सदस्यांना फटकारले तर काहींना समजावले. वीकेंड का वॉरमध्ये सलमानने कोणाला सर्वात जास्त फटकारले असेल तर ते त्याचे माइंड कोच अरफीन खान होते. होस्ट सलमानने अरफीनला इतरांचे ऐकत नसल्याबद्दल फटकारले आणि त्याच्या प्रोफेशनवरही प्रश्न उपस्थित केले.
वीकेंड का वॉरमध्ये सलमान खान अरफीन खानच्या घरातील सहकाऱ्यांसोबतच्या वागणुकीबद्दल सतत रागावताना दिसत होता. सलमान म्हणतो की, त्याच्या आयुष्यात जे काही घडत आहे, तरीही त्याला हे सगळं मॅनेज करायचं आहे. यानंतर टीव्हीचा स्क्रीन बंद होताच अरफीनची पत्नी सारा होस्ट सलमान खानवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. साराचे म्हणणे आहे की तिचा पती आरफीनला टार्गेट केले जात आहे. नंतर ती अरफीनकडे सलमानच्या मताबद्दल तक्रार करताना दिसली. एवढेच नाही तर सारा असेही म्हणते की, ‘आपण असेही म्हणू शकतो की एखादा अभिनेता अभिनेत्यांशी पक्षपात करतो.’
sara: “one actor (salman khan) is being biased towards another actor.” arfeen: “…keep it shut” that’s when they knew they FUCKED UP.#bb18 #biggboss18 #arfeenkhan #saraarfeenkhan pic.twitter.com/Ps7OuXSnkq — z. (@zanabbbbb) October 19, 2024
सोशल मीडियावर सुद्धा बिग बॉसच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अनेक टिपण्या केल्या आहेत की मागील आठवड्यामध्ये अविनाश मिश्राने घरामध्ये अनादर करत आहेत. यावर सलमान खान न बोलता अरफीन खानला फटकारले.
साराचा राग इथेच थांबत नाही. ती पुढे म्हणते, ‘अभिनेते इतर अभिनेत्यांच्या अहंकाराची मालिश करतात.’ साराच्या या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर अरफीन खान तिला ‘चुप रहा’ असे सांगताना दिसली. त्याने पत्नीला शांत करण्याचा प्रयत्न केला. शिल्पा शिरोडकरही हस्तक्षेप करताना दिसल्या आणि तिलाही बोलावण्यात आल्याचं सांगितलं. आता सलमान साराच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार का हे पाहायचे आहे.