साई पल्लवीची तब्येत बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला; नेमकं अभिनेत्रीला काय झालं ?
साऊथ इंडस्ट्री मधील आघाडीची आणि अभिनय संपन्न अभिनेत्री साई पल्लवी कायमच चर्चेत आहे. साई पल्लवी चंदू मोंदेटी दिग्दर्शित ‘तांडेल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या आगामी प्रोजेक्टची सध्या सोशल मीडियावर जोरदा चर्चा होत आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी साई पल्लवी सध्या तिच्या हेल्थमुळे चर्चेत आली आहे. तिला डॉक्टरांनी काही दिवसांसाठी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. नेमकं कारण काय आहे ? जाणून घेऊया…
लज्जास्पद, उदित नारायण यांनी लाइव्ह शोमध्येच फॅनला केलं लिप किस, Video Viral
आज मुंबईमध्ये सई पल्लवीच्या आणि नागा चैतन्यच्या ‘तांडेल’ चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट होता. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटसाठी नागा चैतन्यने उपस्थिती लावली असून अभिनेत्री साई पल्लवीने हजेरी लावलेली नाही. नेमकं अभिनेत्री ट्रेलर लाँचिंग इव्हेंटसाठी अनुपस्थित का राहिली याचं कारण सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साई पल्लवी सतत देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रमोशननिमित्त फिरत आहे. त्या दगदगीमुळे अभिनेत्रीची प्रकृती खालावली होती. विश्रांती न मिळाल्याने तिला ताप आला. अभिनेत्रीला डॉक्टरांनी तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. या कारणामुळे ती ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचू शकली नाही.
चित्रपटाचे दिग्दर्शक चंदू मोंदेटी यांनी अभिनेत्रीच्या हेल्थची माहिती देताना ते म्हणाले की, “साई पल्लवीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली होती, पण प्रवास आणि सततच्या कामामुळे तिची तब्येत खराब झाली आहे. तिला डॉक्टरांनी दोन दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून ती लवकरात लवकर बरी होईल आणि चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पुन्हा सक्रिय होऊ शकेल.” नुकताच मुंबईमध्ये ‘तांडेल’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या इव्हेंटसाठी आमिर खान देखील खास पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये चित्रपटातली मुख्य अभिनेत्री सई पल्लवी न दिसल्याने चाहत्यांची निराशा झाली होती.
साई पल्लवी तिच्या आगामी ‘तांडेल’ या तेलगू चित्रपटामध्ये नागा चैतन्यसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘तांडेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन चंदू मोंडेटी यांनी केले आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘रामायण’मध्ये साई पल्लवीला माता सीतेच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, ज्यामध्ये रणबीर कपूर रामच्या भूमिकेत दिसणार आहे.