Coldplay: मंच कोल्डप्लेचा, सादरीकरण मराठी कलाकारांचे; बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्येंनी कोल्डप्लेच्या टीमसोबत गाजवला रंगमंच
सध्या भारतात ‘कोल्डप्ले’च्या कॉन्सर्टची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नवी मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये ‘कोल्डप्ले’ची टीम आपला परफॉर्मन्स सादर करत आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेली ‘कोल्डप्ले’ची टीम सध्या एका महाराष्ट्रातील कलाकारांमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच ‘कोल्डप्ले’ची टीम ने महाराष्ट्रात परफॉर्मन्स सादर केला. यांच्यासोबत शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमनेही त्यांच्यासोबत मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला.
डबल नव्हे ट्रिपल धमाका, अंकुश चौधरीने केली लोकप्रिय मराठी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा
शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमचं एक स्वप्न सत्यात उतरलं आहे. सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमने—कौस्तुभ, सुषांत, आणि कैलाश —प्रसिद्ध कोल्डप्ले बँडसोबत भारत दौऱ्यात मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला. कोल्डप्लेच्या टीम ने खास सत्यजित आणि त्यांच्या टीमला ह्या शो साठी निवडले. संगीत आणि पपेट्रीच्या अद्भुत संगमातून क्रिस मार्टिन आणि त्यांच्या बँडसोबत “गुड फिलिंग्स”या गाण्यावर सत्यजित आणि त्याच्या टीमने अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला.
शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये यांनी इन्स्टाग्रामवर काही वेळापूर्वीच कॉन्सर्ट दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. प्रसिद्ध जिम हेनसन कंपनीतील अमेरिकन पपेटियर निकॉलेट आणि ड्रू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणामुळे, सत्यजित आणि त्यांच्या टीमने ५ ऐतिहासिक शोमध्ये आपल्या कलागुणांनी जादू निर्माण केली आणि हा क्षण अविस्मरणीय केला. शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये म्हणाले, “या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल कोल्डप्लेला मनःपूर्वक धन्यवाद आणि आमच्यावर प्रेम आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे मनःपूर्वक आभार तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं.आम्हाला जगातील सर्वात मोठ्या कोल्डप्ले कॉन्सर्टचा भाग बनविल्याबद्दल धन्यवाद…”