सई ताम्हणकर लवकरच देणार खास सरप्राईज; पोस्ट करत म्हणाली, '३ फेब्रुवारीला...'
अभिनेत्री सई ताम्हणकर हिची मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. सई ताम्हणकर कायमच आपल्या चाहत्यांमध्ये फॅशनमुळे, लूकमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. २०२४ मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत राहिलेली सई सध्या तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. सई शेवटची ‘अग्नी’ या वेबफिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही तासांपूर्वीच सईने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. येत्या ३ फेब्रुवारीला ती तिच्या अपकमिंग प्रोजेक्टची घोषणा करणार आहे.
सई ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीचा येत्या ३ फेब्रुवारीला कोणता नवीन प्रोजेक्ट येणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. सई पुन्हा नेटफ्लिक्ससोबत कोणता नवीन प्रोजेक्ट करतेय याची उत्सुकता चाहत्यांना आहे. सईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने त्याला कॅप्शन दिले की, “प्रेसिंग प्ले समथिंग सरप्राइज ऑन इज यूर वे… आता हे नक्की काय आहे हे ३ फेब्रुवारीला समजणार !” असं कॅप्शन लिहीत सईने पोस्ट शेअर केली आहे. सई ताम्हणकरची ही पोस्ट तिच्या आगामी वेब सीरिज संदर्भात आहे.
लवकरच सई ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती महिला पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. सई प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘डब्बा कार्टेल’ वेब सीरिजचा ट्रेलर येत्या ३ फ्रेब्रुवारीला म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच या वेब सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझरमध्ये, काही महिलांच्या मदतीने जेवणाच्या डब्यातून ड्रग्सचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचं दाखवण्यात आलंय. या वेब सीरिजमध्ये सई पोलिसांच्या मुख्य भूमिकेत असून तिच्याकडे ही केस आली आहे. या केसचा तपास करत त्याचा छडा लावण्यासाठी ती पुरावे शोधात असल्याचं दिसतंय.