When Did The Idea Of Making A Documentary On The LGBTQIA Community
सध्या युट्यूबसह सर्वत्र सोशल मीडियावर नक्षत्र बागवेच्या ‘द व्हिजिटर’ (The Visitor)वेबसीरीजची जोरदार चर्चा होत आहे. या वेबसीरीजचा नुकताच चौथा सीझन रिलीज झाला. या सीझनचे १० एपिसोड ‘नक्षत्र बागवे’ ह्या युट्यूब चॅनलवर रिलीज झाले आहेत. सध्या सीरीजच्या प्रमोशननिमित्त नक्षत्र व्यग्र आहे. प्रमोशनदरम्यान नक्षत्र बागवेने ‘द व्हिजिटर’ सीरीजबद्दल चाहत्यांसोबत माहिती शेअर केली आहे. ही सीरीज LGBTQ समाजावर आधारित आहे. सीरीजनिमित्त नक्षत्र बागवेने नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने आपल्या वेबसीरीजबद्दल दिलखुलास चर्चा केली.
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेनं अल्पावधीतच पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त
LGBTQ समाजावर सीरीज किंवा डॉक्युमेंट्री काढावी असा प्रश्न प्रमोशनवेळी नक्षत्रला विचारण्यात आला होता. ‘द व्हिजिटर’ सीरीजच्या पहिल्या सीझनची शुटिंग महाराष्ट्रातल्या कोल्हापूरात, दुसऱ्या सीझनची शुटिंग गुजरातच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, तिसऱ्या सीझनची शुटिंग गोव्यातल्या माहित असलेल्या आणि न माहित असलेल्या ट्रॅव्हल स्पॉटला आम्ही भेट देत शुटिंग केली आहे. तर सीरीजच्या चौथ्या सीझनची शुटिंग राजस्थानमध्ये केल्याची माहिती नक्षत्र बागवेने दिली. सीरीजमधील सर्वच कलाकार LGBTQ समाजातीलच होते. आम्ही सर्वच सीरीजमध्ये ज्या राज्यात आम्ही शुटिंग केली, तेथीलच स्थानिक LGBTQ समाजातील कलाकार आम्ही सीरीजमध्ये स्टारकास्ट म्हणून घेतले. अशी माहिती मुलाखतीत नक्षत्र बागवेने दिली.
‘द व्हिजिटर’ सीरीजच्या चारही सीझनमध्ये सर्वच कास्ट आणि क्रू LGBTQ समाजातीलच होते. ज्यांनी केव्हा कॅमेराही हातात घेतला नव्हता अशा लोकांनाही मी शिकवून कॅमेरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. मी सीरीजमधील कलाकारांसोबत व्हॉट्स ॲपच्या माध्यातून ॲक्टिंगचे वर्कशॉप घेतले होते. शुटिंग सुरु होण्याच्या २ महिनाआधी आम्ही कलाकारांची कास्टिंग केली होती. मी वेगळ्या राज्यात, ते वेगळ्या राज्यात असल्यामुळे आम्ही बराच वेळ व्हॉट्स ॲपच्या माध्यातून ॲक्टिंगचे वर्कशॉप घेतले होते. अनेकदा तर एक एकट्या कलाकारासोबतही मी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या ॲक्टिंगचे वर्कशॉप घेतले आहेत, अशी माहिती नक्षत्र बागवेने दिली.
‘चंद्रमुखी’च्या निस्सिम सौंदर्याचं नेमकं रहस्य काय ? अमृता खानविलकरने शेअर केला खास व्हिडिओ…
“मी LGBTQ समाजातील आहे, त्यामुळे या समाजावर काहीतरी प्रोजेक्ट्स काढावे असं माझ्या मनात होतं. मी जेव्हा दिग्दर्शक किंवा निर्माता नव्हतो तेव्हा अनेक प्रोजेक्ट्स हे HIV सारख्या विषयावरच यायचा. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी रिलेटेबल नव्हत्या. पण तरीही त्या मी दाखवल्या. माझ्या आयुष्यातल्या गोष्टी अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या, त्यामुळेच माझ्या पहिल्या शॉर्टफिल्मला पुरस्कार मिळाला. माझा चाहतावर्ग सर्वाधिक शहरात नाही पण ग्रामीण भागात आहे. याचा किस्सा एक आहे. “मला गेल्या काही वर्षांपूर्वी सुंदरबन मधून एका व्यक्तीचा मेसेज आलेला. तो मला म्हणालेला की, माझ्या गावात रेंज मोबाईल नेटवर्क येत नाही, त्यामुळे मी तीन- चार किलोमीटर लांब येतो. तिथे मला रेंज आली की तुमची शॉर्टफिल्म पाहतो आणि मी माझ्या गावी परततो. मी माझ्यासाठी एकटाच आहे, असं मला वाटायचं. पण तुम्हाला पाहिल्यामुळे मला वाटतं की, लांब तरी का होईना माझ्यासोबत कोणतरी आहे.” कायमच मला माझ्या कथानकाचं कौतुक वाटतं, जे कोणी नाही ते मी कंटेंट देतो यासाठी माझ्या मनात LGBTQ समाजावर डॉक्युमेंट्री काढावा असा विचार आला…”, असं मुलाखती दरम्यान नक्षत्र बागवेने सांगितलं.
मिस्टर अँड मिसेस भगत ‘शिवतीर्था’वर, अंकिता वालावलकरने पतीसोबत दिलं राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण