सैफ अली खान हल्ला प्रकरण; आरोपीच्या पोलीस कोठडीत 'इतक्या' दिवसांची वाढ; कोर्टाचा निर्णय
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद आलियान असं आहे. काल (शनिवारी) मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पुढील चौकशी आरोपीची खार पोलिस स्टेशनमध्ये करण्यात येत आहे.
शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाजवळील कामगार छावणीमध्ये लपून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. १६ जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून अभिनेत्यावर चाकू हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने पोलिसांसमोर दिली आहे. आरोपी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच, मुंबई पोलीस आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत शनिवारी (१८ जानेवारी) मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास मोहम्मद आलियानला ताब्यात घेतलं.
‘माझी बायको फक्त माझीच…’, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याबाबत अभिषेक जरा स्पष्टच बोलला
खार पोलिस स्टेशनमध्ये आरोपीची चौकशी करण्यात आल्यानंतर तिथून पुढे आरोपीला वांद्रेमध्ये सुट्टीकालीन न्यायालयात नेण्यात येणार आहे. सैफ अली खानवर हल्ला होऊन तीन दिवस झाले आहेत. अखेर तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई पोलिसांच्या आणि कासारवडवलीच्या पोलिसांच्या अथक प्रयत्नाने हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. अभिनेत्याच्या हल्लेखोराला पकडणे ही बाब मुंबई पोलिसांच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे. काही वेळातच मुंबई पोलीस यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. मोहम्मद आलियानचा चेहरा सैफच्या इमारतीती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी बराच मिळताजुळता आहे. मोहम्मद अलियान कोणालाही संशय येऊ नये म्हणून ठाण्यात नाव बदलून राहत होता.
अभिनेत्यावर हल्ला करणारा हल्लेखोर विजय दास या नावाने ठाण्यातील एका बारमध्ये हाऊस किपिंगचे काम करत होता. हिरानंदानी इस्टेटपासून काही अंतरावर असणाऱ्या एका लेबर कॅम्पमध्ये मोहम्मद राहायला होता. तिथे तो आपला वेष पालटून राहत होता. मुंबई पोलिसांना हल्लेखोराबद्दल माहिती मिळताच वेळ न दवडता शनिवारी रात्री तातडीने मोहम्मदच्या मुसक्या आवळण्यासाठी कोव्हर्ट ऑपरेशन राबवण्यात आले.
‘डोळे की मायाजाळ, बघताच क्षणी प्रेमात पडाल’: नावानेही राणी आणि रूपानेही
जेव्हा मोहम्मदला पोलिस आपल्याला पकडण्यासाठी येत आहे, याची कुणकुण लागली होती. तेव्हा त्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी लेबर कॅम्पपासून काही अंतरावर असलेल्या जंगलात शिरला. मुंबई पोलीस आणि कासारवडवली पोलिसांचे पथक मध्यरात्री २ वाजता लेबर कॅम्पच्या परिसरात पोहोचली. मात्र, मोहम्मद आलियान अगोदरच जंगलात पळून गेला होता. त्यामुळे पोलिसही त्याला शोधण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नसताना जंगलात शिरले. पोलिसांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मोहम्मद आलियानचा शोध सुरु केला. पोलिसांच्या पथकाने जंगलाच्या परिसराला घेराव घातला. अखेर पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर मोहम्मद आलियान पहाटे पावणेतीनच्या सुमारास पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तातडीने मुंबई आणले.
मोहम्मद आलियानला ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. तेव्हा त्याने आपण अभिनेत्याच्या घरात चोरीच्या उद्देशानेच शिरल्याची प्राथमिक कबुली दिली. मोहम्मद आलियान हा बांगलादेशी घुसखोर असून तो एका नामांकित कंपनीत कंत्राटी बेसेस कामगार होता. सैफ अली खानवर हल्ला करुन परतल्यानंतर त्याने लूक बदलला. तो लेबर कॅम्पमधील काही लोकांना पोलीस इकडे आले होते का, असे विचारत होता. यामुळे काही कामगारांना त्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.