चित्रपट न करता अमृता सिंह कमावते कोट्यवधी, सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?
१९८३ साली रिलीज झालेल्या ‘बेताब’ चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री अमृता सिंग ८०- ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण आता ती मोठ्या पडद्यापासून थोडी दूर आहे. तिला चांगल्या भूमिका मिळत नाहीत किंवा ती आता काम करण्यात फारसा रस घेत नाहीत, याविषयी नक्की माहिती नाही, पण असं असलं तरी अमृता आजही लाखोंची कमाई करते.
सनी देओलसोबत इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणाऱ्या अमृता सिंगने ‘मर्द’, ‘साहेब’, ‘चमेली की शादी’, ‘नाम’, ‘खुदगर्ज’ आणि ‘वारीस’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला. अमृताने बॉलिवूडमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर एक विशेष स्थान निर्माण केले होते. 1990 च्या दशकाच्या मध्यात तिच्या करिअरमध्ये गती कमी झाली आणि ती चित्रपट सृष्टीपासून काही काळ दूर झाली. आज अर्थात ९ फेब्रुवारी रोजी अमृता सिंगचा वाढदिवस आहे. अभिनेत्री आज आपल्या फॅमिलीसोबत ६७ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. आज अमृताच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया ती एकही चित्रपटात काम करत नसतानाही कशी काय लक्झरी लाईफ जगतेय ?
कोकण हार्टेड गर्लच्या लग्नाची तारीख आणि वेळ आली समोर, दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात
अमृता सिंगच्या आईचं नाव रुक्साना सुलताना होते. त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. त्यांचे वडील शिविंदर सिंग विर्क हे पंजाबी हिंदू होते. त्यांना तीन मुले होती. दोन मुली आणि एक मुलगा. असे म्हणतात की, त्यांची आई अतिशय श्रीमंत कुटुंबातील होती. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी अमृता सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जबरदस्त चर्चेत राहिली आहे. तिच्या खासगी आयुष्यात अनेक उलथापालथ घडलेल्या आहेत. सनी देओल आणि विनोद खन्नासोबतही अमृताचं नाव जोडलं गेलं होतं. पण लग्नाच्या आधीच दोघांसोबतही अमृताचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर अमृता ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खानच्या प्रेमात पडली.
‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर अमृता आणि सैफची एकमेकांसोबत मैत्री झाली आणि नंतर काहीच कालावधीत त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सैफ अली खान तेव्हा इंडस्ट्रीमध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. त्याआधीच सैफने अमृतासोबत १९९१ मध्ये लग्न केले. अमृता सिंग सैफपेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. पण दोघांचेही कुटुंबीय त्यांचं नातं स्वीकारत नव्हते. परंतु दोघांनीही लग्न केले आणि अमृताने सैफसाठी इस्लाम धर्मही स्वीकारला. लग्नानंतर, अमृता सिंगने चित्रपटात काम कमी केले आणि तिचं सर्व लक्ष कुटुंबावर केंद्रीत केलं. त्यानंतर, ते दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन मुलांचे पालक झाले.
पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याचे निधन
१३ वर्षांच्या सुखी संसारानंतर अमृता आणि सैफचा २००४ मध्ये घटस्फोट झाला होता. सैफ अली खानने अमृताला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून ५ कोटी रुपये दिले होते. याशिवाय एक बंगलाही दिला होता ज्यात ते स्वतः राहत होते. पण आता तिथे अभिनेत्री तिच्या मुलांसोबत राहते. त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. घटस्फोटानंतर सैफ अली खानने अमृता सिंगला इब्राहिम १८ वर्षांचा होईपर्यंत दर महिन्याला १-१ लाख रुपये दिले. ते मुलांच्या संगोपनासाठी होते. या घटस्फोटाने अमृताच्या जीवनाने एक मोठे वळण घेतले, पण तिच्या विलासी जीवनशैलीत काही बदल झाला नाही. घटस्फोटानंतर, अमृता सिंगने ‘टू स्टेट्स’ आणि ‘बदला’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले, त्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने मोठी रक्कम कमवली.
चित्रपटांसोबतच, अमृताला विविध ब्रँडसाठीही प्रोत्साहन मिळालं, जिथे तिने आपली शैली आणि प्रसिद्धी वापरून व्यवसायिकदृष्ट्या फायदा केला. अमृता सिंगच्या मामाचं डेहराडूनमध्ये आलिशान घर होतं. प्रचंड जमीन होती. त्यांना ते विकायचं होतं पण अमृताने आक्षेप घेतलेला. म्हणूनच त्यांनी ते विकलं नाही आणि निधन होण्यापूर्वी केअरटेकरला दिलं पण ते त्याने त्याच्या नावावर करुन घेतलं. त्यानंतर अमृता सिंगने तिच्या मावशीसह त्याच्याविरुद्ध कोर्टात केस केली आणि जिंकली. आता ती ५० कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. अमृता सिंगने मुंबईत स्वतःचा फ्लॅट आणि फार्म हाऊस देखील खरेदी केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे १५ दशलक्ष डॉलरची म्हणजेच १२३ कोटींची संपत्ती आहे. अमृता सिंग जाहिरातींमधूनही कमावते आणि त्यासाठी ती एका जाहिरातीचे सुमारे २० लाख रुपये घेते.