फोटो सौजन्य: सोशल मीडिया
प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून कमालीचे चर्चेत आहेत. उदित नारायण यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका महिला चाहतीला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका इव्हेंटमधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उदित नारायण पुन्हा एकदा महिलांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यावर नेटकऱ्यांनी कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे. काही नेटकऱ्यांनी उदित यांच्यावर निशाणा साधत त्यांना ‘सीरियल किसर’ असं नावं दिलं आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार मराठी पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं…
जैकी यादव नावाच्या फॅनच्या एक्स पेजवरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, गायक काही महिला चाहत्यांसोबत किस करताना दिसत आहेत. त्यांचा हा दुसरा व्हिडिओ असून उदित यांना अनेक चाहते ‘सीरियल किसर’ म्हणत आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यांनंतर त्यांची पुन्हा एकदा कानउघडणीही केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असं दिसतंय की, उदित नारायण स्टेजवर उभे असलेले दिसत आहेत. तिथे अनेक महिला त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात. आधी उदित व्हिडीओत थंब दाखवतात आणि नंतर एका चाहतीला ओठांवर किस करतात. एका वादामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उदित पुन्हा एकदा एका व्हिडिओच्या माध्यमातून वादाच्या भोवऱ्यात अडकले. या व्हायरल व्हिडीओमुळे उदित चांगलेच टीकेचे धनी ठरले आहेत.
अब लो, एक नया ‘सीरियल KISSER’ मार्केट में आ चुका है! 😂😂
उदित नारायण की एक वीडियो पहले ही वायरल थी, अब दूसरी भी आ चुकी है।
महिलाएं तो बस सेल्फी लेने आई थीं, मगर उदित जी के निशाने पर सिर्फ ओंठ थे! 😳😂
ये कोई साधारण KISS नहीं, बल्कि ओंठो वाली स्पेशल KISS चाहिए इन्हें! 😆🔥… pic.twitter.com/FH3D2HXDE2
— Dr. Jyotsana (jyoti) (@DrJyotsana51400) February 7, 2025
तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरुन मोठा हंगामा होताना दिसत आहे, त्यातच त्यांचा हा दुसरा किसिंग व्हिडीओ आहे. एका युजरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय, आता बघा, “बाजारात एक नवीन ‘सिरीयल KISSER’ आला आहे! उदित नारायण यांचा एक व्हिडीओ आधीच व्हायरल झाला होता, आता दुसरा व्हिडीओ देखील आला आहे. त्या महिला फक्त सेल्फी काढण्यासाठी आल्या होत्या, पण उदितजींचे लक्ष्य फक्त त्यांच्या ओठांकडे होते! हे सामान्य किस नाही, तर ओठांनी केलेलं एक खास किस आहे! भाईसाहेब, त्यांनी इमरान हाश्मीसोबत स्पर्धा करायला सुरुवात केली आहे.”
दुसऱ्याने लिहिलंय, “आता बाजारात एक सीरियल KISSER आला आहे… उदित नारायण यांचा आणखी एक व्हिडिओ आला आहे. महिला उदित नारायणसोबत सेल्फी काढत आहेत, पण उदित नारायण त्यांचे ओठ शोधून त्यांना धडाधड किस करत आहेत. उदित नारायण सामान्य किस करत नाही, त्यांना ओठांवर केललं किस हवं आहे.” ७९ वर्षीय उदित नारायण मागील काही दिवसांपासून सातत्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. पहिला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड टीका झाली होती.