salman khan
‘बिग बॉस ओटीटी 2’ नंतर अभिनेता सलमान खान लवकरच बिग बॉसचा 17 वा (Bigg Boss 17) सीझन घेऊन येणार आहे. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वापासून सलमान खान (Salman Khan) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान, ‘बिग बॉस 17’साठी सलमानने मोठी रक्कम आकारल्याची माहिती मिळाली आहे.
सलमान खान एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो. ‘बिग बॉस 17’साठीही त्याने तगडं मानधन घेतलं असल्याची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमानने ‘बिग बॉस 17’साठी आठवड्याला 12 कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा सुरु आहे. याचाच अर्थ एका भागासाठी सलमानला सहा कोटी रुपये मिळणार आहेत. एवढंच नाही तर या संपूर्ण सीझनसाठी सलमानने 200 कोटी रुपये घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सिंगल विरुद्ध कपल अशी थीम
‘बिग बॉस 17’ची यंदाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी आहे. कपल म्हणून अंकिता लोखंडे आणि विक्की जैन, पायल मलिक, अरमान मलिक, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, कंवर ढिल्लो आणि ऐलिस कौशिक खेळणार आहेत; तर सिंगलच्या यादीत अभिनेत्री इशा सिंह, फहमान खान, जय सोनी, इशा मालवीय, समर्थ जुरेल, यूट्यूबर हर्ष बेनिवाल यांच्या नावाचा समावेश आहे.
यंदाच्या ‘बिग बॉस 17’ च्या सीझनमध्ये बिग बॉस आटीटी 2 मधील स्पर्धक जैद हदीदची मैत्रीण फिरोझा खान, बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवची मैत्रीण कीर्ती मेहरा, अभिनेत्री ममता कुलकर्णी, अनुपमा फेम अभिनेता सागर पारेख, ऋषभ जैस्वाल, विवेक चौधरी, खुशी पंजाबनही सहभागी होणार आहेत.