अनेक अफेयर्सनंतरही सलमान खानने का केलं नाही लग्न? अखेर वडिलांनी सांगितलं सिंगल राहण्यामागचं कारण
बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान याला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा भाईजान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सलमान गेल्या तीन दशकांपेक्षा अधिकच्या काळापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तीन दशकांपेक्षा अधिक असलेल्या फिल्मी करियरमध्ये सलमानने ॲक्शन आणि रोमान्ससह वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा भाईजान अद्यापही सिंगलच आहे. ५९ वर्षीय सलमानच्या सिनेकरियरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नावंही जोडलं गेलं आहे. अभिनेता लग्न का करत नाही, या प्रश्नांची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. अलीकडेच सलमानचे वडील सलीम खान यांनी त्यांचा मुलगा अद्याप सिंगल का आहे, याचा खुलासा केला. त्यांनी एका मुलाखतीत या प्रश्नाचा उलगडा केला.
‘देवमाणूस’ परत येतोय! टीझर प्रदर्शित; किरण गायकवाड कमबॅक करणार?
सलमान खानचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत. सुपरस्टार सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. परंतु त्याने अद्याप लग्न केले नाही. आता, सलमान खानचे वडील सलीम खान यांचा एक जुना व्हिडिओ रेडिटवर व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी कोमल नाहटा यांना सलमान अजूनही अविवाहित का आहे यामागचे कारण सांगितले. सलीम खान यांनी सांगितले की, “जेव्हा सलमान कोणत्याही महिलेसोबत रिलेशनशीपमध्ये येतो तेव्हा तो त्या महिलेमध्ये त्याच्या आईसारखे गुण शोधण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी तो कमिटमेंटमध्ये असतो, तेव्हा तो तिला बदलण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्या लाईफ पार्टनरमध्ये अभिनेता आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतो. ते शक्य नाही. ती त्याला सकाळी शाळेत सोडते, किंवा सकाळी त्याचा नाश्ता बनवते, संध्याकाळी त्याचा गृहपाठ करते. या सर्व गोष्टी ज्या एक सामान्य आई घरी करते.”
प्रसाद ओकनं केलं समीर चौघुलेचं कौतुक, म्हणाला, “ “एकट्या”ने हे धाडस करणं जिकीरीचं, पण… ”
सलीम यांनी असंही सांगितलं की, “करिअरला समर्पित असलेल्या महिलेने फक्त घरकाम करावे अशी अपेक्षा करणे सलमानच्या बाजूने चुकीचे आहे.” सलीमच्या मते, “सलमानच्या प्रेयसीने तिच्या करिअरच्या ध्येयांपासून विचलित होऊ नये. तर सलमानला वाटते की, लग्नानंतर तिने घराची काळजी घ्यावी.” पुढे याच मुलाखतीत सलीम यांनी खुलासा केला की, “सलमान खानने लग्न न करण्याचे कारण त्याची परस्परविरोधी विचारसरणी आहे. सलमान मुख्यतः ज्या अभिनेत्रींसोबत काम करतो, ज्या जवळच्या वातावरणात काम करतात आणि छान दिसतात त्यांच्याकडे आकर्षित होतो. तथापि, जेव्हा ते त्यांच्या करिअरबद्दल सावध होतात आणि जीवनात उच्च ध्येय ठेवतात तेव्हा गोष्टी बदलतात.”