समंथाची जिद्द पडतेय तिच्या आजारांवर भारी, ठरतेय रुग्णांसाठीही आदर्श; 'या' आजाराने त्रस्त असूनही करतेय वर्कआऊट
टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक समांथा रुथ प्रभू आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतंच तिची ‘सिटाडेल: हनी बनी’ सीरिज रिलीज झाली. दरम्यान, सीरीजमधील अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी समांथा सध्या तिच्या हेल्थमुळे चर्चेत आली आहे. समांथा रुथ प्रभूला २०२२ मध्ये मायोसिटीस नावाचा गंभीर दुर्मिळ आजार झाला होता. आता त्यानंतर अभिनेत्रीला चिकनगुनिया आजार झाला आहे.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. कायमच फोटोंमुळे आणि वेगवेगळ्या व्हिडिओंमुळे चर्चेत राहणाऱ्या समांथाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडिओ तिच्या फॅन्स ग्रुपने देखील एक्सवर म्हणजेच ट्वीटरवरही शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना, “चिकनगुनियातून बरी होत आहे, पण सोबतच अंगही दुखतंय…” अशा आशयाचं कॅप्शन देत अभिनेत्रीने व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“Recovering from Chikungunya is so fun 😌 😌 😌 The joint pains and ALL”
Queen @Samanthaprabhu2 💛#SamanthaRuthPrabhu𓃵#Samantha #SamanthaRuthPrabhu#CitadelHoneyBunny #RaktBramhand#MaaIntiBangaram pic.twitter.com/m94S1yMV8R— Samcults (@Samcults) January 10, 2025
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने वर्कआऊट करताना ब्लू कलरची सँडो बनियन आणि ब्लॅक नाईट पँट वेअर करत व्हिडिओ शेअर केला आहे. चिकनगुनिया आजारामुळे अभिनेत्रीला सांधेदुखी होत असल्याचं आणि त्यातून बरं होणं ही मजेशीर गोष्ट असल्याचंही समांथाने म्हटलं आहे. आजारपणातही समांथाला वर्क आऊट करताना पाहून चाहते थक्क झाले आहेत. अभिनेत्राचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. दरम्यान, समांथा प्रभू आणि वरुण धवन स्टारर ‘सिटाडेल: हनी बनी’ वेब सीरिज नोव्हेंबर २०२४ मध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आली होती. सीरिजमध्ये समांथाने एजंटची भूमिका साकारली होती.
२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरुवात, पहिल्याच दिवशी गीतकार जावेद अख्तरांना विशेष