Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑडिशनमध्ये मिळाला नकार पण ‘रुबाब’मध्ये झळकले रुबाबात! संभाजी-शीतलची कहाणी

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत असून, संभाजी ससाणे–शीतल पाटील ही फ्रेश जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 22, 2026 | 08:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ हा संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतो आहे. हा संवाद बोलणारा संभाजी ससाणे आणि जिच्यासाठी तो आहे ती शीतल पाटील ही फ्रेश आणि डॅशिंग जोडी चित्रपटापूर्वीच लक्ष वेधून घेत आहे. मात्र या दोघांचा ‘रुबाब’पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, हे फार कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे, चित्रपटासाठी घेतलेल्या पहिल्या ऑडिशनमध्ये संभाजी ससाणे आणि शीतल पाटील या दोघांनाही नकार मिळाला होता. तरीही पुढे तेच या चित्रपटाचे हिरो-हिरोईन बनले. हा प्रवास संघर्ष, संयम आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा घेणारा ठरला.

Bigg Boss Marathi 6: एकीकडे वादाची ठिणगी, तर दुसरीकडे राधा–सागरची मजेशीर जुगलबंदी; घरात रंगला ‘सासू -सून’ ड्रामा

आपल्या निवडीबद्दल बोलताना संभाजी ससाणे सांगतो, “संजय झणकर सरांचा मला फोन आला आणि काही दिवसांनी आमची भेट झाली. मला वाटलं की ऑडिशन होईल किंवा पुढची चर्चा होईल. पण तेव्हा मला थेट सांगण्यात आलं ‘आम्ही जसा मुलगा शोधतोय, तू तसा नाहीस.’ तो क्षण थोडासा निराश करणारा होता. पण दोन-तीन आठवड्यांनंतर पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आलं की, मी चित्रपटाचा भाग आहे. त्या क्षणी खूप आनंद झाला. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी टीमचा मनापासून आभारी आहे.”

शीतल पाटीलचाही अनुभव काहीसा असाच आहे. ती म्हणते, “ऑडिशनसाठी बोलावलं तेव्हा मला वाटलं एखादी छोटी भूमिका असेल. ऑडिशननंतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या प्रतिक्रिया पाहून मला जाणवलं की, इथे काहीच जमत नाहीये. त्यामुळे मी फारशी अपेक्षा ठेवली नव्हती. पण काही दिवसांनी अचानक फोन आला आणि सांगण्यात आलं की, माझी लीड रोलसाठी निवड झाली आहे. मोठ्या पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि ‘रुबाब’ने ते माझं स्वप्न पूर्ण केलं.”

या निवडीमागचं कारण स्पष्ट करताना दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे आणि निर्माते संजय झणकर सांगतात, “सुरुवातीला दोघांचेही ऑडिशन आमच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. पण शीतलचा चेहरा, डोळे आणि तिचं व्यक्तिमत्त्व त्या भूमिकेसाठी अगदी योग्य होतं. वर्कशॉपदरम्यान तिने स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलं. संभाजी आणि शीतल दोघांनीही मेहनतीने आपल्या भूमिका घडवल्या आणि आज तेच आमचे हिरो–हिरोईन आहेत.”

गोंधळलेलं, अपूर्ण पण सुंदर प्रेम, ‘दो दीवाने सहर में’ चित्रपटातील पहिलं गाण रिलीज, ‘आसमा’मधून मिळणार प्रेमाचा नवा अनुभव

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून, संजय झणकर आणि गौरी झणकर हे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांची ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘रुबाब’ तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.

Web Title: Sambhaji and shital of rubab how they got selected for the rubab movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 08:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.