(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात जिथे एकीकडे वादाची ठिणगी पडली आहे, तिथेच दुसरीकडे राधा आणि सागर कारंडे यांच्यातील मजेशीर जुगलबंदीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होणार आहे. या दोघांनी ‘सासू आणि सून’ यांचे रूप धारण करत घरातील सदस्यांना चांगलेच हसवले आहे. बिग बॉस’च्या घरात राधा-सागरचा ‘सासू -सून’ ड्रामा रंगणार असून त्याच्यातील मजेशीर संवादांनी घरात हस्याचे वातावरण निर्माण झालं आहे.
काय आहे ‘सास-सून’ किस्सा?
राधाने मजेशीर रित्या सासूची भूमिका साकारली असून ती आपल्या सुनेच्या (सागरच्या) आणि घरातील इतर ‘मॉडर्न सुनांच्या’ तक्रारी करताना दिसत आहे. राधाच्या अस्सल मालवणी ढंगातील संवादफेकीने यामध्ये अधिकच रंगत आणली आहे.
मजेशीर संवाद :
राधा (सासूच्या भूमिकेत): “ह्या पोरी जरा कामाला मदत करत नाहीत, मी सगळं घर किती सांभाळू?” माळ हुकूम देत असतात. आणि तो सागऱ्या …
“सासूबाई, संपलं असेल तर जेवायला वाढा चला!”
राधा : या नवीन मॉर्डन सुना आल्या आहेत, याना काही वळण नसल्यासारखं… अहो, “आमचं तर नाचकामच बंद पडल्यासारखा झालाय!” काय सांगू अजून…
घरात हास्याची कारंजी!
या संवादावर घरातील इतर सदस्यही पोट धरून हसताना दिसले. राधाची ही वेगळी शैली आणि सागरची तिला मिळालेली साथ यामुळे तणावाच्या वातावरणात काही काळ आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
तर याच भागातील एक नवीन प्रोमोमध्ये राकेश कमालीचा संतापलेला दिसत असून तो घरातील कामाच्या मुद्द्यावरून अनुश्रीवर निशाणा साधताना दिसतो आहे. राकेश म्हणाला, “घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे?” असा प्रश्न राकेशने उपस्थित केला आहे. राकेशचा हा आक्रमक अवतार पाहून घरातील इतर सदस्यही अवाक झाले आहेत. दुसरीकडे, अनुश्रीनेही राकेशला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोघांमध्ये एकमेकांवर ओरडण्याची आणि ‘चूप’ राहण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. राकेश वारंवार तिला गप्प राहण्यास सांगत असताना अनुश्रीनेही त्याला तितक्याच प्रखरपणे उत्तर दिले आहे.






