६५ इंजेक्शन आणि जुळ्या बाळांची अपेक्षा, प्रसिद्ध अभिनेत्रीचं तिसऱ्या महिन्यातच झालं गर्भपात; व्हिडिओ शेअर करत व्यक्त केलं दु:ख
संभावना शेठ आणि तिचा पती अविनाश मिश्रा आपल्या चाहत्यांना लवकरच ‘गुड न्यूज’ देणार होती, पण त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री वयाच्या ४४ व्या वर्षी बाळाला जन्म देणार होती. दरम्यान, ती तीन महिन्यांची प्रेग्नेंट होती, पण प्रेग्नंसी कॉम्प्लिकेशन्समुळे अभिनेत्रीचा गर्भपात झाला आहे. संभावना यामुळे प्रचंड धक्क्यात असून तिने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. लग्नानंतर ९ वर्षांनी संभावना गरोदर राहिली होती. संभावना आणि पती अविनाश यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मात्र आता त्यांना या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे.
प्रेमाची परिभाषा मांडणार ‘तुझा झालो गं’ गाणं, प्रेमाची व्याख्या गाण्यातून कळणार
अभिनेत्री चाहत्यांना १८ डिसेंबर २०२४ रोजी ‘गुड न्यूज’ देणार होती. पण नेमकं त्याचदिवशी अभिनेत्रीसोबत वाईट घटना घडली. अभिनेत्रीने १९ डिसेंबर २०२४ ला म्हणजेच काल युट्यूबवर ब्लॉग शेअर करत चाहत्यांना दु:खद बातमी सांगितली आहे. ब्लॉगमध्ये संभावना आणि तिचा पती अविनाशने सर्व सविस्तर घटना सांगितलीये. ब्लॉगमध्ये अभिनेत्रीचा पती म्हणतो, “आमच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे बेबी प्लॅनिंग करतोय, पण आम्हाला यश मिळत नव्हतं. यावर्षी संभावना गरोदर राहिली. ती तीन महिन्यांची प्रेग्नेंट होती, पण तिचा गर्भपात झाला. येत्या १८ डिसेंबरला आम्ही चाहत्यांना ‘गुड न्यूज’ देणार होतो. आमच्या दोघांचीही फॅमिली बाळासाठी खूप तयारी करत होती. शिवाय, आम्ही संभावनाची खूप काळजीही करत होतो. ”
संभावनाच्या पतीने पुढे सांगितले की, आम्ही सर्वच तिची खूप काळजी घेत होती. पण देवाच्या मनात ते नव्हतंच. आम्ही तिची इतकी काळजी घेऊनही डॉक्टरांना आश्चर्य वाटलं की, इतकं अगदी सगळं सुरळीत होतं तरीही ही घटना कशी घडली ? डॉक्टरांनी संभावनाला जुळे बाळ होणार असंही सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही सर्वच आणखीनच आनंदित होतो. पण या घटनेमुळे आम्हा सर्वांचाच हिरमोड झाला आहे. मला संभावनासाठी खूप वाईट वाटतं आहे. कारण, गेल्या तीन महिन्यांपासून तिने स्वत: खूप त्रास सहन केला आहे.” पुढे संभावनाने सांगितलं की, “या संपूर्ण प्रक्रियेत मी ६५ इंजेक्शन्स घेतले. हे सगळं माझ्यासाठी खूप वेदनादायी होतं. पण मी बाळासाठी आनंदाने केलं. जेव्हा मला वाटलं की, इंजेक्शन्स आता बंद होतील तेव्हा माझ्या बाळाच्या हृदयाचे ठोकेच थांबले.”
‘पानिपत’च्या वेळी ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने ए.आर.रहमान यांची का मागितली माफी ? वाचा किस्सा…
संभावना सेठने अविनाश द्विवेदीसोबत २०१६ मध्ये लग्न केले. भावनाने पागलपन (2001), दीवाना में दीवाना (2013) आणि लव्ह डॉट कॉम (2009) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.