'पानिपत'च्या वेळी 'या' सुप्रसिद्ध दिग्दर्शकांनी ए.आर.रहमान यांची का मागितली माफी ? वाचा किस्सा...
बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी सध्या ऐतिहासिक सिनेमांना बॉक्सऑफिसवर प्रंचड मोठा प्रतिसाद पहायला मिळत आहे. ओम राऊत दिग्दर्शित’तान्हाजी, द अनसंग वॉरियर’ सिनेमा असो किंवा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ सिनेमा असो,. शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या सिनेमांसाठी थिएटर कायमच हाऊसफुल्ल झाले होते. सध्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मरक्षक महावीर संभााजी महाराज’ या सिनेमाला देखील प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. असाच एक ऐतिहासिक सिनेमा काही वर्षांपूर्वी येऊन गेला ज्याचं नाव होतं “पानिपत”. दिल्लीचं तख्त काबीज करण्याचं शिवरायांचं स्वप्न उराशी बाळगून मराठे महाराष्ट्राची वेस ओलांडून बादशाही सत्तेवर भगवा रोवण्यासाठी सज्ज झाले होते. मराठ्यांचा या पराक्रम पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीतला ‘पानिपत’ हा महत्वाचा सिनेमा म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
‘पुष्पा २’च्या समोर ‘बेबी जॉन’ टिकू शकेल का? ॲटलीने दिलं ठोस उत्तर
जसं पानिपतच्या लढाईत मराठ्य़ांचा पराक्रमाने बादशाही सुलतानांना सळो की पळो केलं होतं, त्याचप्रमाणे या सिनेमातील कलाकरांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आशुतोष गोवारीकर यांनी याआधीदेखील बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमे केले आहेत. ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ या सिनेमांमुळे बॉलिवूुडमध्ये आशुतोष गोवारीकर हे नाव आदराने घेतलं जातं. गोवारीकर यांचे सिनेमे जसे भव्य दिव्य असतात तसेच त्यातील गाणी देखील त्याचतोडीचे असातात. याला पानिपत सिनेमा देखील अपवाद नाही. दिग्दर्शनाबरोबरच सिनेमातील गाण्याचं संगीतही सिनेमा यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं असतं. पानिपतच्या आधीच्या गोवारीकरांच्या बऱ्याच सिनेमातील गाण्यांना ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं होतं. गोवारीकर आणि ए.आर रहमान यांच्या मैत्रीची केमिस्ट्री त्यांच्या प्रत्येक कामातून दिसून येते. गोवारीकरांच्या ‘पानिपत’ सिनेमाला देखील आर. रहमान यांचं संगीत असणार असं प्रेक्षकांना वाटत होतं मात्र तसं झालं नाही. याबाबत सिमेमाच्या निमित्ताने एका मुलाखतीत आशुतोष गोवारीकर यांनी खुलासा केला आहे.
पानीपत सिनेमातील संगीतावर काम करण्याआधी आशुतोष गोवारीकर यांनी चक्क ए.आर.रहमान यांना माफीनामा दिला होता. या माफीनाम्यात गोवारीकर एआर रहमान यांना म्हणाले की, “आता पर्यंतच्या सिनेमातील गाणी हीट झाली याचं श्रेय तुम्हाला जातं. मात्र माझ्या आगामी सिनेमाच्या गाण्याच्या संगीताची जबाबदारी मला नव्या संगीतकार जोडीला द्यावी असं वाटतं. याबाबत मला तुमची परवानगी हवी होती आणि त्याचबरोबर मला यावेळेला तुमच्याबरोबर काम करता येणार नसल्याने मला माफ करावं”. असा माफीनामा गोवारीकरांनी एआर रहमान यांना दिला होता. गोवारीकरांच्या या निर्णयाचा आदर राखत एआर रहमान यांनी नव्या सिमेमाला भरभरुन शुभेच्छा दिल्या. अखेर या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्यावर सोपवली. त्यानंतर या संगीतकार जोडीचं नाव ‘सिंघम’ आणि ‘अग्नीपथ’नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये ऐकू आलं. ‘पानिपत’ सिनेमातील कलाकारांचा अभियनय, युद्ध प्रसंगासाठी वापरण्यात आलेल्या तांत्रिक बाबी आणि दिग्दर्शन याप्रमाणे सिमेमातील गाण्यांना ही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्याचप्रमाणे आशुतोष गोवारीकर आणि ए.आर. रहमान यांच्यातील मैत्रीचं नातं पाहून चाहता वर्गाही भारावून गेला.