Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BIGG BOSS OTT 3 विजेती अभिनेत्री देतेय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, म्हणाली, “माझ्या शरीरातील पेशी…”

'बिग बॉस ओटीटी ३' ची विजेती सना मकबूल सध्या एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सनाने सांगितले आहे की टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूप्रमाणे ऑटोइम्युन हेपेटायटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे, जो यकृतासंबंधित गंभीर आजार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 11, 2025 | 03:22 PM
BIGG BOSS OTT 3 विजेती अभिनेत्री देतेय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, म्हणाली, “माझ्या शरीरातील पेशी…”
Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस ओटीटी ३’ ची विजेती सना मकबूल सध्या एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सनाने सांगितले आहे की टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूप्रमाणे ऑटोइम्युन हेपेटायटिस (Autoimmune Hepatitis)नावाच्या आजाराने ती सुद्धा ग्रस्त आहे, जो यकृतासंबंधित गंभीर आजार आहे. या आजारात शरीराच्या पेशी यकृतावर हल्ला करतात. ज्यामुळे आरोगयाच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. सना मकबूलने नुकताच तिच्या आरोग्याबद्दल भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणारा ‘छावा’ ओटीटीवर वर्चस्व गाजवणार, जाणून घ्या कुठे आणि कधी रिलीज होणार!

दरम्यान, सना मकबूलला हा आजार २०२० मध्ये झाला होता. सुरुवातीला कोणतीही विशिष्ट लक्षणे नव्हती, परंतु हळूहळू तिची तब्येत बिघडू लागली. त्यानंतर जेव्हा तिची चाचणी करण्यात आली तेव्हा तिला ऑटोइम्युन हेपेटायटिस (Autoimmune Hepatitis) असल्याचे आढळून आले. मुलाखतीत सना मकबूल म्हणाली की, “आरोग्याच्या कारणांमुळे मी अलीकडेच शाकाहारी झालेय. बऱ्याच लोकांना माहित नाही की मला ऑटोइम्यून हेपेटायटीस नावाच्या आजाराचे निदान झाले आहे. माझ्या शरीरातील पेशी माझ्या यकृतावर हल्ला करत आहेत. कधीकधी हा आजार ल्युपससारखा दिसतो, जो मूत्रपिंडांवर परिणाम करू शकतो किंवा संधिवातही होऊ शकतो. हा आजार २०२० मध्ये आढळून आला. याची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत. समांथा रूथ प्रभू यांना मायोसिटिस हा स्नायूंशी संबंधित आजार आहे. पण, मला यकृतासंबंधित आजार आहे.”

 

रश्मिका मंदानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदाराची सारवासारव, काय म्हणाले रवी कुमार गौडा

पुढे सना मकबूल म्हणाली की, “या आजाराशी लढण्यासाठी मला अनेक औषधांची मदत घ्यावी लागते. यासाठी मी स्टिरॉइड्स, इम्युनोसप्रेसन्ट्स किंवा काही औषधे घेत आहे. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही याबद्दल डॉक्टरांचे मत स्पष्ट नाही. हा आपल्या जीवनशैलीसंबंधित विकार आहे. यामुळे माझी तब्येत सतत बदलत असते. कधीकधी मला बरे वाटते, तर कधीकधी मला खूप अशक्तपणा जाणवतो. मला माहित नाही आता हे पूर्णपणे बरे होईल की नाही.” ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Bigg Boss OTT 3) जिंकल्यानंतर सनाने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले. तिने ‘बिग बॉस १८’ चा विजेता करणवीर मेहराबरोबर एक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. अलीकडेच, ती नेझीबरोबर ‘भामाई’नावाच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. त्यामुळे आजारपणातही सना तिच्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

Web Title: Sana makbul talks about her health condition suffering from liver disease autoimmune disorder similar to samantha shocked bharti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Bigg Boss OTT 3
  • Bollywood
  • Bollywood Actress

संबंधित बातम्या

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास
1

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो
2

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया
3

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो
4

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.