Rashmika Mandanna vs Congress MLA Ravi Ganiga: trouble for giving controversial statement
एकीकडे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाच्या सक्सेसचा आनंद रश्मिका घेत आहे, तर दुसरीकडे तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे ती चर्चेत आली आहे. कर्नाटकाचे काँग्रेस आमदार रवी गानिगा यांनी रश्मिकावर आरोप केला आहे की, तिने कर्नाटकमधील एका फिल्म फेस्टिव्हलचं आमंत्रण नाकारलं आहे. यासह आमदारांच्या एका वक्तव्यामुळे वातावरण कमालीचं ढवळून निघालं आहे. तसेच कोडवा समुदायाने रश्मिकाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आमदारांच्या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर आता त्या आमदारांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे.
प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, वयाच्या ४३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कर्नाटक राज्यातील विरोधी पक्षासह काही सेलिब्रिटींनीही त्या प्रकरणावर आमदारांच्या विधानाचा समाचार घेतल्यानंतर रवी गनिगा यांना घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. काँग्रेस आमदार रवी गनिगा यांनी रश्मिकाने कर्नाटका फिल्म फेस्टिव्हलचं निमंत्रण नाकारलं आहे. तिला धडा शिकवावा लागेल, असं विधान केलं होतं. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आमदार रवी गनिगा म्हणाले की, “जेव्हा मी म्हणालो की, ‘मी तिला धडा शिकवेल’ याचा अर्थ असा नाहीये की मी तिला काही इजा पोहोचवेल किंवा तिच्यावर वैयक्तिक पातळीवर हल्ला करण्याचं माझं उद्दीष्ट नव्हतं. माझं तिला केवळं एवढंच सांगणं होतं की तू ज्या शिडीच्या सहाय्याने इतक्या उंचीवर पोहोचली आहेस ती शिडी आणि त्याच्या पायऱ्या केव्हा विसरू नकोस. त्या शिडीवर लाथ मारू नकोस. नाही तर तू तुझ्या हातानेच खाली पडशील. मला तिला एवढंच सांगायचं होतं की, तू तुझ्या राज्याचा सन्मान राखायला हवा. मी रश्मिकाचे चित्रपटही पाहिले आहेत. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी माझे शब्द, माझं राज्य, माझी भूमी आणि माझ्या कन्नड भाषेच्या सन्मानासाठी भूमिका घेत राहणार, बोलत राहणार.”
रवी गनिगा यांनी बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास रश्मिकाने नकार दिल्याचा आरोप केला होता. तसेच ज्या इंडस्ट्रीमधून (कन्नड) तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला धडा शिकवू नये का? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर रश्मिकाच्या टीमने हे सर्व आरोप ‘पूर्णपणे खोटे’असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार रवी कुमार गौडा (गणिगा) आणि कन्नड कार्यकर्ते टीए नारायण गौडा यांनी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने स्वतःला ‘कर्नाटकऐवजी हैदराबादची’ असल्याचे सांगितल्यानंतर तिच्यावर टीका केली होती. दरम्यान, कोडावा नॅशनल कौन्सिल (सीएनसी)ने अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना पत्र देत अभिनेत्रीला सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली होती.